अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी श्री बाळासाहेब कोळेकर साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी म्हटले आहे निवेदनात म्हटले आहे की मागील वर्षी संपुर्ण राहाता तालुक्यातील सर्व सहा मंडळात अतीवृष्ट्रीमळे खरीप हंगामातील पिके व फळबागांचे नुकसान झाले होते शिवाय महसूल विभागाने पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव सादर केले व शासनाने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे परंतु विमा कंपनीने मागील महिन्यात तालुक्यातील तिन मंडाळाचा शेतकऱ्यांचा पिक विमा रक्कम बँकेत जमा केली व राहीलेले पुणतांबा राहाता शिर्डी या मंडळातील विमा देण्यास टाळाटाळ करीत आहेत अनेक वेळा निवेदनाद्वारे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिले असताना विमा कंपनी अद्याप पर्यंत विमा देत नाही त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांना आठ दिवसांत विमा रक्कम देण्यास भाग पाडावे अन्यथा शेतकरी संघटना व तालुक्यातील पुणतांबा राहाता शिर्डी या मंडळातील विमाधारक शेतकरी मोठे आंदोलन छेडतील असे म्हटले आहे या निवेदनावर विठ्ठलराव शेळके सावळेराम आहेर राजेंद्र चौधरी बाळासाहेब चव्हाण सोपान वाघ बाळासाहेब साबदे नितीन आग्रे आनिल रक्टे ज्ञानेश्वर सोडणार दत्तात्रय यादव विनायक देठे ज्ञानदेव माऊली शेळके आदी कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या सह्य आहेत.
0 Comments