टाकळीभान प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुका बांधकाम कामगार सनियंत्रण समितीच्या सदस्य पदी किशोर उर्फ गणेश छल्लारे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी श्रीरामपूर तालुक्याचे आ. हेमंत ओगले माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे साहेब तसेच श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण दादा ससाणे व महिला बालकल्याण समितीच्या सभापती मंजुश्रीताई मुरकुटे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले उपनगराध्यक्ष कांचनताई सानप आदींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. गणेश छल्लारे यांचे बांधकाम कामगार संदर्भात काम मोठे असून बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्याचप्रमाणे सर्व सामान्यांना विविध शासकीय योजनांचा लाभमिळवून देणे यासाठी ते तत्परतेने कार्य करत असतात. माजी आ. भानुदास मुरकुटे, अशोकचे संचालक नीरज मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली छल्लारे यांचे विविध सामाजिक उपक्रम व सामाजिक काम सुरू आहे.
0 Comments