संजय इनामके यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर



लोहगाव (वार्ताहर): लोहगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय इनामके यांना नुकताच राहुरी येथील आधार फाउंडेशनचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 
सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन आधार फाउंडेशन च्या वतीने कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे. संजय इनामके हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राहाता तालुका सरचिटणीस आहेत. थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी माध्यमातून समाजात जनजागृती करणे, ओबीसी उपेक्षित व वंचित समाजातील जनसामान्यांच्या अडचणी सोडवणे आदी सामाजिक कार्याची दखल घेऊन आधार फाउंडेशनने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. शनिवार दि. 13 जून रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सकाळी10 ते 2 या वेळेत अण्णासाहेब शिंदे बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

या पुरस्काराबद्दल ना‌ . छगन भुजबळ अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य ,मा .खा .समीर भुजबळ, भाजपा जिल्हा शहर अध्यक्ष अनिल शेठ मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते , रावसाहेब म्हस्के ,मच्छिंद्र गुलदगड, प्रशांत शिंदे, नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर , ,किशोर बोरावके, साहेबराव निधाने, धनंजय गाडेकर, ॲड.रवी काका बोरावके, भगवानराव टिळेकर,अजय मोहिते, , सुधीर म्हस्के, प्राचार्य विनायक मेथवडे , प्रा .शरद दुधाट , प्रा. सुनील गायकवाड योगेश म्हस्के , भाऊसाहेब चेचरे ,पत्रकार विजय बोडखे , कोंडीराम नेहे ,प्रकाश औताडे,अनिल बेंद्रे, गोरख गवारे ,सुहास वैद्य ,बाबासाहेब अंत्रे ,राजू म्हस्के, अनंता खर्डे, संदीप राऊत, शांतवन बनसोडे, आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments