राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील अभिनेता प्रमोद भाऊसाहेब पंडीत यांना नुकताच नाशिक येथे कलावंत विचार मंच कमल फिल्म प्रोडक्शन आणी कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे कलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी जेष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे,अभिनेत्री दिपाली कुलकर्णी, प्रा.सोमनाथ मुठाळ, कवीयत्री सुनीता वाळुंज हे उपस्थित होते अभिनेते प्रमोद भाऊसाहेब पंडीत यांनी कलावंत पुरस्कार नाशिक येथे स्वीकारला यावेळी महाराष्ट्राचे अनेक कलावंतांना पुरस्कार देण्यात आले प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments