भुवनेश्वरच्या साईभक्त श्रीमती संजूक्ता स्वाईन यांनी साई चरणी सात लाख 56 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ब्रोंच केला अर्पण!

शिर्डी (प्रतिनिधी)-शिर्डीला दररोज हजारोंच्या संख्येने व सण उत्सवाच्या वेळी लाखोंच्या संख्येने साईभक्त साई दर्शनासाठी येत असतात.श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. येथे आल्यानंतर व साई दर्शनानंतर असंख्य भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात.

 अशाच प्रकारे भुवनेश्‍वर, ओडीसा येथील साईभक्त श्रीमती संजुक्‍ता स्‍वाईन या साईभक्ताने नुकताच ०७ लाख ५६ हजार ३३८ रुपये किंमतीचा ६२ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्‍तांचा सत्‍कार केला.
 यावेळी भुवनेश्वरच्या साईभक्त श्रीमती संजूक्ता स्वाईन ह्या म्हणाल्या की, आम्ही 17ते 18 वर्षापासून शिर्डीला वर्षातून दोनदा येतो. येथे आल्यानंतर खूप आनंद व समाधान मिळते. आम्हाला बाबांनी भरभरून दिले आहे. येथे कायम कायम यावे वाटते.व बाबांच्या चरणी काही अर्पण करावेसे वाटते. अशी आमची इच्छा नेहमी असते असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांचा परिवारही उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments