दिलीप शिंदे
सोयगाव दि२६---२०२६ चा लांबलेला उन्हाळा मानवा सहित पक्षी व सर्वच वन्यजीव यांना घातक ठरला आहे. तीव्र उन्हा मुळे बऱ्याच झाडांना पालवी फुटणे ही लांबनीवर पडले आहे. पक्षांना याचा मोठा फटका बसतांना दिसत आहे.शहरातील सर्वत्र सिमेंटची रस्ते, घर, इतर विकास कामे ई. या सिमेंट वापरलेल्या ठिकाणी वातावरणातील उष्णतेहुन अधिक गरम झळा खालून येतात व तो त्रास पक्षी सहन करणे अशक्य होते.
सिल्लोड येथील जैवविविधता संवर्धक, इजा ग्रस्त वन्यजीव, पक्षांवर उपचार करणारे डॉ.संतोष पाटील यांच्याकडे शहर व परिसरातील नागरिक उन्हाचा फटका बसून हिट स्ट्रोक झालेले अनेक पक्षी या १५ दिवसांत घेवून आले व त्यांतील ९ पैकी ७ ला वाचविण्यात यश आले आहे.काळे रंग असणाऱ्या पक्षांना हिट स्ट्रोक चा फटका अधिक बसतो कारण काळा रंग हा उष्णता अधिक शोषतो तर पांढरा रंगाचे पक्षी पंख-त्वचेत मेलानीन रंग द्रव्य अभावा मुळे पक्षी उन्हाने अधिक प्रभावित होतात.काही दिवसा आधी (बल्गुली टोपीवाला )ए सीयन टिट प्रजातीचा सुंदर पक्षी उन्हामुळे बेशुद्ध पडलेल्या आढळून आला.मध व क्षार संजीवनीची मात्रा व त्यावर शीतल पाण्याचे हबकारे,स्प्रे करून,त्याचे पाय गार पाण्यात काही वेळ ठेवून त्यास नवं आयुष्य लाभले.सर्व पक्षी एम. टी. डी. सी. च्या मागील तलावा जवळ दिवस मावळतीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
-- पक्षांसाठी आपली जबाबदारी ---- घर अथवा इमारतीवर मातीच्या भांड्यात स्वच्छ गार पाणी सावली राहील अशा पद्धतीने ठेवावे.पाण्यात थोडे ग्लुकोज टाकावे.पाणी दररोज बदलावे ,
0 Comments