--आयोजक व शिर्डी (प्रतिनिधी)-
साई पालखी फिल्म व RG7 स्टुडिओज प्रस्तुत शिर्डी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव 2026 चे भव्य दिव्य असे शिर्डी येथे रविवार 24 मे 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती या महोत्सवाचे आयोजक व लघुपट दिग्दर्शक मधुकर कर्डक व रंगराव घागरे यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे दिग्दर्शक मधुकर कर्डक व रंगराव घागरे यांनी म्हटले आहे की, शिर्डी येथे साईबाबांच्या नगरीत प्रथमच आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला असून येथे लघुपट स्क्रीनिंग आणि भव्य पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 24 मे 2026 या दिवशी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.खा. डॉ. सुजयदादा विखे पा., श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, तसेच शिर्डीचे उपनगराध्यक्ष अभय (भैय्या) शेळके पा. आदी मान्यवर राहणार आहेत.
तर प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाचे मा. अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले, चित्रपट दिग्दर्शक निर्माते डॉ. अशोक गाविंत्रें, उद्योजक मनोज कदम, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून अभिनेते प्रकाश भागवत, अभिनेते प्रणव रावराणे, अभिनेता प्रशांत तपस्वी,अभिनेते चंद्रशेखर सांडवे, अभिनेते किशोर अग्रवाल, अभिनेत्री माधवी जुवेकर, अभिनेत्री प्राजक्ता हनमगर , बाल अभिनेत्री इरा पारवडे ,आदी उपस्थित राहणार आहेत. या लघुपट महोत्सवात स्क्रीनिंग वेळ सकाळी दहा ते पाच राहणार असून पारितोषिक वितरण सोहळा सहा ते आठ या वेळेत शिर्डी येथील 9 कॉइन हॉटेल ,साई बाबा मंदिराजवळ लक्ष्मीबाई शिंदे मार्ग ,कौशल्य नगर ,शिर्डी येथे होणार आहे. या महोत्सवात प्रेक्षकांसाठी लघुपट स्क्रीनिंग विनामूल्य राहणार आहे. अनेक लघुपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होत असून या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा .असे आवाहन महोत्सव आयोजक व लघुपट दिग्दर्शक मधुकर कर्डक व रंगराव घागरे यांनी केले आहे.दिग्दर्शक मधुकर कर्डक व रंगराव घागरे.
0 Comments