टाकळीभान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा काढण्याची तयारी प्रशासनाकडून चालू असताना ग्रामस्थांच्या मध्यस्थीना मुदत एक महिन्याची देण्यात आली .
असून, एक महिन्याच्या आत कायदेशीर कागदपत्राची रीतसर परवानगी घेऊनच पुतळा चांगल्या प्रतीचा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात यावा व तोपर्यंत पुतळा झाकून ठेवण्यात यावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांना देण्यात आले.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे ६ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा विना परवानगी स्टँड परिसरामध्ये ग्रामस्थांच्या वतीने बसवण्यात आला होता. शासनास सदर माहिती मिळताच त्या संदर्भात सूचना ग्रामस्थांना वेळोवेळी देण्यात आल्या होत्या. परंतु आज यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून कालपासूनच पुतळ्या काढण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर अचानकपणे ग्रामस्थांनी सकाळी गाव बंदचे अवाहन केले होते. व त्याप्रमाणे व्यापारी व ग्रामस्थांनी गाव बंद केले होते.
परंतु आज सकाळी पोलीस स्टेशन समोर
पोलीस प्रशासन, महसूल व बांधकाम अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली. यातून सर्व प्रशासनाचे अधिकारी व ग्रामस्थां मध्ये या संदर्भात चर्चा होऊन, यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी जय दत्त भवर व पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे येथील ग्रामस्थांच्या भावना कळविल्या व वरिष्ठांनी पुतळ्यास लागणाऱ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली. परंतु तोपर्यंत पुतळा झाकून ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. यावेळी ग्रामस्थां कडून आरती करून पुतळा झाकण्यात आला. प्रशासनाकडून आलेत्यामुळे आश्वासनामुळे गाव पूर्ववत सुरू झाले.
0 Comments