सिल्लोड तालुक्यातील अंधारी भाजप मंडळ प्रभारी पदी सोयगाव येथील सुनिल गावंडे यांची नियुक्ती --




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०८ -- सोयगाव शहरातील रहिवासी असलेले सुनिल कृष्णराव गावंडे यांची सिल्लोड तालुक्यातील अंधारी भारतीय जनता पार्टी मंडळ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटन कौशल्य असलेले व नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळून देण्यासाठी सुनिल गावंडे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. याची दखल घेत भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी सुनिल गावंडे यांची सिल्लोड तालुक्यातील अंधारी मंडळ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र दिले आहे. सुनिल गावंडे यांच्या या निवडीबद्दल जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे,भाजपा शहराध्यक्ष मंगेश सोहनी, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष मयुर मनगटे, ज्येष्ठ सदस्य वसंत बनकर, माजी नगराध्यक्ष कैलास काळे, राजेंद्र जावळे, सुनिल ठोंबरे,प्रमोद पाटील,संजय मोरे, संजय आगे,दीपक पाटील, महेश मानकर, सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे,नंदा आगे, आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments