भाजपा सोयगाव मंडळ प्रभारी पदी सुनिल मिरकर यांची नियुक्ती --




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०८ -- सोयगाव तालुका भारतीय जनता पार्टी मंडळ प्रभारी म्हणून भाजपाचे नेते सुनिल मिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उत्तर जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी सुनिल मिरकर यांना सोयगाव मंडळ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र दिले आहे.

 संघटन कौशल्य असलेल्या सुनिल मिरकर यांच्या या निवडीबद्दल भाजपा शहराध्यक्ष मंगेश सोहनी, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष मयुर मनगटे, ज्येष्ठ सदस्य वसंत बनकर, माजी नगराध्यक्ष कैलास काळे,सुनील गावंडे, राजेंद्र जावळे, सुनिल ठोंबरे,प्रमोद पाटील,संजय मोरे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments