सनातन धर्मातील संन्यास म्हणजे केवळ बाह्य वस्त्रांचा बद्दल नाही तर तो अहंकार, ममंत्व आणि संसारबद्धतेचा पूर्ण आहे त्याग--मंहत आत्मारामगिरीजी महाराज

गडकरी राजकुमार 

शिर्डी ( प्रतिनिधी)- सनातन धर्मातील संन्यास म्हणजे केवळ बाह्य वस्त्रांचा बदल नाही, तर तो अहंकार, ममत्व आणि संसारबद्धतेचा पूर्ण त्याग आहे. वेद, उपनिषद आणि संन्यास परंपरेत संन्याशांचे चार प्रकार सांगितले आहेत.
कुटीचक, बहूदक, हंस आणि परमहंस. हे चार प्रकार म्हणजे साधकाच्या आत्मिक प्रवासाचे क्रमशः उंचावत जाणारे टप्पे आहेत. असे अध्यात्मिक प्रबोधन श्री नर्मदेश्वर सेवा धामचे महंत राजराजेश्वरी शिव रुद्राक्ष मुकुटधारी, संन्यासी आत्माराम गिरीजी महाराज यांनी केले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, संन्यास परंपरेतील पहिला प्रकार म्हणजे
कुटीचक संन्यासी होय. प्रारंभिक वैराग्य
कुटीचक संन्यासी हा संन्यासाच्या मार्गातील पहिला टप्पा मानला जातो.
‘कुटी’ म्हणजे झोपडी. हा संन्यासी एखाद्या पवित्र स्थळी किंवा आपल्या गावाजवळ कुटी बांधून राहतो.
तो आपल्या आयुष्याला साधेपणात आणतो, परंतु त्याच्या जीवनात अजून काही प्रमाणात संबंध आणि आसक्तीचे सूक्ष्म धागे राहतात. भिक्षा तो बहुतांश वेळा परिचितांकडून किंवा कुटुंबीयांकडून घेतो.
    या अवस्थेत साधक बाह्य त्याग करतो, पण अंतर्मनातील पूर्ण निर्लेपता अजून विकसित होत.असते.तर दुसरा प्रकार बहूदक संन्यासी होय.हा अलिप्ततेची वृद्धी बहूदक संन्यासी हा पुढील टप्पा आहे.तो एकाच ठिकाणी राहत नाही, तर सतत भ्रमण करतो. ‘बहूदक’ म्हणजे अनेक ठिकाणी भिक्षा घेणारा.या अवस्थेत साधकाचे कुटुंबाशी असलेले संबंध पूर्णतः तुटतात. तो समाजात राहतो, पण समाजाशी त्याचे आसक्त नाते संपुष्टात येते. येथे वैराग्य अधिक दृढ होते आणि साधना अधिक गहन बनते.तर तिसरा हंस संन्यासी होय. विवेक आणि आत्मचिंतन
‘हंस’ हा नीर-क्षीर विवेकाचा प्रतीक आहे.हंस संन्यासी हा अत्यंत विवेकी, संयमी आणि ज्ञानमार्गी असतो.तो बाह्य जगात वावरत असला तरी त्याचे मन पूर्णतःआत्मतत्त्वाकडे वळलेले असते.अहंकार आणि ‘मीपणा’ हळूहळू क्षीण होऊ लागतो. या अवस्थेत साधकाला आत्मज्ञानाची झलक मिळू लागते. तसेच संन्याशी मार्गातला चौथा प्रकार म्हणजे परमहंस संन्यासी होय. ब्रह्मसाक्षात्कार
परमहंस ही संन्यासाची सर्वोच्च अवस्था आहे.
या अवस्थेत संन्यासी पूर्णतः अहंकारशून्य होतो आणि त्याला ‘अहं ब्रह्मास्मि’ या महावाक्याची प्रत्यक्ष अनुभूती येते.

त्याच्यासाठी कोणताही भेद उरत नाही.ना आपले-परके, ना सुख-दुःख, ना लाभ-हानी.
तो सर्वत्र ब्रह्म पाहतो आणि ब्रह्मातच स्थित राहतो.
संन्यासाचा अंतर्गत प्रवास
संन्यासाचे हे चार प्रकार प्रत्यक्षात आत्म्याच्या शुद्धीकरणाचा प्रवास आहेत.
कुटीचक म्हणजे बाह्य त्याग ,तर 
बहूदक म्हणजे संबंधांचा त्याग, तसेच हंस म्हणजे अहंकाराचा त्याग व परमहंस म्हणजे पूर्ण आत्मसाक्षात्कार होय. असे महंत आत्मारामगिरीजी यांनी म्हटले आहे.
त्यांनी स्वतःबद्दलही पुढे सांगितले की,मी, संन्याशी आत्माराम गिरी, आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या कृपेने संन्यास दीक्षा प्राप्त केली आहे. आणि जुना आखाडा परंपरेशी जोडलेलो आहे.संन्यासाच्या चार प्रकारांपैकी, माझी वर्तमान स्थिती ही ‘बहूदक संन्यासी’ या प्रकाराशी सुसंगत आहे.
मी एका ठिकाणी स्थिर न राहता धर्मप्रसार, ग्रंथलेखन आणि साधनेसाठी भ्रमण करीत असतो.कुटुंबीय संबंधांचा त्याग करून व्यापक समाजाला आत्मज्ञानाचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे.
माझ्या जीवनाचा उद्देश हा वैयक्तिक नव्हे, तर समाज आणि आत्मकल्याण हा आहे
तथापि, हा अंतिम टप्पा नाही.
माझा सतत प्रयत्न हा हंस आणि पुढे परमहंस अवस्थेकडे प्रगती करण्याचा आहे. असे सांगत संन्यास ही स्थिर अवस्था नसून एक सतत उन्नत होणारी साधना आहे.
जो साधक या चार टप्प्यांतून प्रामाणिकपणे प्रवास करतो, तोच शेवटी परमहंस पदाला पोहोचतो.संन्यास म्हणजे पलायन नव्हे,तर तो आहे. स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी एकरूप होण्याचा दिव्य मार्ग.
    संन्यास धर्म समजून घेतला तर नक्की समजेल. असे महंत
संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांनी अध्यात्मिक प्रबोधन करताना म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments