दिलीप शिंदे
सोयगाव दि.२७-- सोयगाव तालुक्यातील जंगला गावाजवळ दि. २७ सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मीठ घेऊन जाणारा कंटेनर उलटल्याची घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी, गुजरात येथून दांडी मीठ भरलेला एम एच २१ बी एच १७१९ क्रमांकाचा कंटेनर चालक दिनेश चव्हाण रा.शिंदखेडराजा जि.बुलढाणा व परमेश्वर पवार रा.भवानी पांगरी ता.बदनापूर हे फर्दापूर कडून सोयगाव येथे दांडी मीठ पोहच करण्यासाठी सोयगाव कडे जात असतांना जंगला गावाजवळ वळणावर कंटेनर चा हुक तुटल्याने मिठाने भरलेला कंटेनर वळणावर उलटल्याची घटना सोमवारी सकाळी घडली तर कंटेनर चा पुढचा भाग पुढे जंगला गावाच्या बाजूला गेल्याने सुदैवाने या अपघातात चालक व क्लिनर बचावले आहे. घटनास्थळावर दांडी मीठ गोण्याचा सडा पडला आहे. दरम्यान सोयगाव - फर्दापूर हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो.परंतु अपघात सकाळी घडल्याने मोठी हानी टळली.घटनेची माहिती मिळताच पत्रकार दिलीप शिंदे व योगेश बोखारे यांनी घटनास्थळी धाव घेत चालक व क्लिनर यांची विचारपूस केली.
0 Comments