सावळीविहिरच्या कारवाडी परिसरात चार ते पाच बिबट्यांचा वावर! शेतकऱ्यांमध्ये भीती!

रात्रीचा शेतीसाठी होणारा वीज पुरवठा दिवसा करण्यात यावा-सरपंच ओमेश जपे यांची मागणी

शिर्डी (प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील कारवाडी परिसरात एक नव्हे तर चार ते पाच बिबट्यांचा वावर असून  अनेकांच्या दृष्टीस ते पडल्यामुळे व कॅमेरात कैद झाल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून हे बिबटे रात्री बिनधास्तपणे सरपंच ओमेश जपे  व शिवाजी आगलावे यांच्या वस्ती जवळील उभ्या ऊस व मका मध्ये फिरताना दिसत असल्यामुळे येथे बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली.

 आहे. या बिबट्यांनी परिसरातील काही कुत्रेही फस्त केले आहेत. काही शेतकऱ्यांवर या बिबट्याने धाव घेण्याचाही प्रयत्न केला आहे. या बिबट्यांमुळे परिसरात रात्री शेतीला पाणी देण्यास कुणी धजवत नाही. त्यामुळे पिके जळून चालले आहेत. येथील कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचेशी या संदर्भात
 संपर्क केला असता त्यांनी वन विभागाशी चर्चा केली  व तात्काळ दोन पिंजरे येथे लावण्यात आले. पण बिबटे पिंजऱ्यात अडकत नसल्यामुळे आणखी भीती निर्माण होत आहे. त्यानंतर सोमवारी कार्यकर्त्यांनी जि.प.मा. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील   यांच्याशी संपर्क केला असता कोपरगावचे वन विभागाचे अधिकारी शेख साहेब व कर्मचारी एस एस साखरे यांनी सोमवारी दुपारी कार्यकर्त्यांसमवेत त्या परिसरात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी‌ येथे पाच बिबटे असून त्यांनी काही जणांवर धाव घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यामुळे येथे पाणी भरण्यास रात्री कोणी जात नाही. तेव्हा या भागात शेतीसाठी करण्यात येणारा वीजपुरवठा रात्री ऐवजी दिवसा करण्याची वीज वितरण कंपनीकडे त्यांनी मागणी करत वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी केली. तर यावेळी वनक्षेत्रपाल शेख साहेब यांनी येथे पहिले दोन व अजून दोन ते तीन पिंजरे लावण्यात येतील तसेच रात्री नाईट विजनचा ड्रोन कॅमेरा फिरून पाहणी करण्यात येईल व या बिबट्यांचा बंदोबस्त केला जाईल .असे सांगत लहान मुले वयस्कर तसेच शेतमजूर यांनी या भागात रात्री फिरण्याचे टाळावे. स्वतःची आपआपल्या परीने काळजी घ्यावी.व वन विभागाला सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी केले. यावेळी मा. सरपंच अशोकराव आगलावे, तंटामुक्ती अध्यक्ष जिजाबा आगलावे, उपसरपंच विकास जपे, रामदास पा. आगलावे, राजेंद्र आगलावे, सुनील आगलावे, संजय जपे, राजू सोपानराव आगलावे, सचिन आगलावे, किशोर जपे, कैलास सदाफळ, सुनील झुरळे, पत्रकार राजेंद्र गडकरी, पप्पू आगलावे, संतोष आगलावे, महेश जपे ,कैलास पळसे ,किरण जपे, विजू आगलावे,रमेश जपे,आदींसह कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाईट व्हिजन ड्रोन कॅमेऱ्याने परिसरात बिबट्यांची होणार पाहणी व चार ते पाच पिंजरे परिसरात लावण्यात येणार --वनक्षेत्रपाल शेख साहेब.



Post a Comment

0 Comments