दिलीप शिंदे
सोयगाव दि.२७-- सोयगाव तालुक्यातील आमखेडा ग्रामपंचायत अंतर्गत गौण खनिज, वारस फेरफार व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्यांवरील इंगल व पत्रांची (लोखंडी) चौकशी संदर्भात दि.१ मे महाराष्ट्र दिनी पंचायत समिती कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाळू हेमराज बेदवे हे आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन दि.१५ एप्रिल रोजी तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना देण्यात आले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाळू हेमराज बेदवे यांनी १) आमखेडा ग्रामपंचायत अंतर्गत गावात टाकण्यात आलेल्या मुरुमाची रॉयल्टी (चलन पावत्या) याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.२) आमखेडा ग्रामपंचायत अंतर्गत वारसा नुसार फेरफार करण्यात आले त्याची फेरफार करण्यासाठी नियमानुसार जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रति मिळावी.
३) आमखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्यांवरील जुने लोखंडी इंगल व पत्रे यांचा लिलाव करण्यासाठी नियमानुसार मागितलेली परवानगी, लिलाव प्रक्रिया कशी करण्यात आली याची चौकशी करून कारवाई करावी.
४) महादेव मंदिर रस्त्याचे सिमेंट काँक्रिट ने काम करण्यात आले.या कामाच्या चौकशी झाल्याशिवाय ठेकेदारास रक्कम देऊ नये याकरिता ग्राम पंचायत सदस्य यांनी उपोषण केले होते. मात्र कोणतीही चौकशी न करता संबंधित ठेकेदारास रक्कम दिली याची चौकशी करण्यात यावी. वरील मागण्याची सात दिवसात चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अन्यथा १ मे महाराष्ट्र दिनी पंचायत समिती कार्यालय सोयगाव येथे सकाळी ११ वाजेपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सोयगाव व गटविकास अधिकारी पंचायत समिती सोयगाव यांना दि.१५ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल किंवा नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments