टाकळीभान: गावातील तरुण युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवून गावचा नाववलौकिक वाढवावा असे उद्गार टाकळीभान सेवा संस्थेचे अध्यक्ष मंजाबापू थोरात यांनी काढले टाकळीभान सेवा संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील निवडीबद्दल तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या युवकांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रम प्रसंगी टाकळीभान सेवा संस्थेच्या वतीने राष्ट्रवादी किसान सभेच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले प्रगतशील शेतकरी राजेंद्र कोकणे यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुणे शहर पोलीस सेवेमध्ये निवड झालेले गावातील भूमिपुत्र दीपक ब्राह्मणे, राहुल औटी, पुणे लोहमार्ग पोलीस दलामध्ये निवड झालेले प्रमोद कलंके, अहिल्यानगर पोलीस दलामध्ये निवड झालेले सोपान बनकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेवा संस्थेचे माजी चेअरमन राहुल पटारे, शेतकरी संघटनेचे प्रभारी व प्रवक्ते प्रा. कार्लस साठे सर, माजी चेअरमन एकनाथ पटारे, व्हा. चेअरमन अविनाश लोखंडे, मा. व्हा. चेअरमन रोहिदास बोडखे, संचालक विजय कोकणे, शिवाजी पवार, अण्णासाहेब दाभाडे, बापूसाहेब शिंदे, भाऊसाहेब गव्हाणे, सोसायटीचे सचिव रामदास ब्राह्मणे, रघुनाथ शेळके, छोटू बनकर, रवींद्र शिरसाठ, संजय ब्राह्मणे, विजय नारळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी निवड झालेले पदाधिकारी राजेंद्र कोकणे व यशस्वी युवकांचे सेवा संस्थेच्या पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन व्हा. चेअरमन अविनाश लोखंडे यांनी केले.तर आभार राहुल पटारे यांनी मानले.
0 Comments