साईबाबा संस्थान शिर्डी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.संस्थानच्या ५४ आदर्श कर्मचाऱ्यांचा गौरव.



शिर्डी( राजकुमार गडकरी)-
 श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आज एक मे रोजी सकाळी ७.१० वाजता संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध विभागातील ५४ आदर्श कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले, श्री. अतुल वाघ, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक तसेच सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, शैक्षणिक संकुलाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गाडीलकर यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. तसेच संस्थानच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत, भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे संस्थानच्या सेवा कार्याचा विस्तार सातत्याने होत असल्याचे नमूद केले. मागील वर्षभरात संस्थानामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
श्री साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले. यावर्षीपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी NEET व JEE मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच बाह्यस्त्रोतावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ESIC रुग्णालय सेवेचा प्रस्ताव प्रगतिपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात संस्थानच्या विविध विभागांतील ५४ कर्मचाऱ्यांचा आदर्श कर्मचारी म्हणून प्रशस्तीपत्र, शाल व श्री साई दिनदर्शिका देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. एन रामप्रसन्‍ना नाईक, डॉ. अजिंक्‍य पानगव्‍हाणे, राजेंद्र कोते, किशोर गवळी, योगेश सोनवणे, सुनिल साखरे, राहुल गोडगे, बबन वाघे, बेबीताई नागरे, पंढरीनाथ ठुबे, बाबासाहेब बढे, देवराम धाकतोडे, म्‍हाळु सोनवणे, आसाराम गोरे, अशोक गोतृक्ष, सचिन जाधव, राहुल वाणी, केशव उदावंत, अनिल गाढवे, प्रदीप डांगे, राजेंद्र नन्नवरे, बापूसाहेब गायके, चंद्रशेखर धनवटे, केशव मोरे, अनिल सोमवंशी, अलका खैरनार, शरद कोते, दत्तात्रय कार्ले, बाबासाहेब लोंढे, बाळासाहेब पाचोरे, संतोष धाकतोडे, संजय मोहिते, मधुकर मोरे, शरद शिरोळे, उत्तम भडांगे, गोकुळ शिंदे, निलेश मराठे, अंकुश बाराहाते, राजेंद्र साबळे, विजय उपाध्ये, कल्पना बोधक, पोपट धनेश्वर, जगन्नाथ शेटे, प्रशांत गिरी, सुधाकर गायकवाड, सुनील जोशी, सुनील ओहोळ, गणेश कावले, हुसेन सय्यद, अरविंद बनकर, सुमित्रा बिराजदार, दिगंबर सलगरकर, राजेंद्र मारकड, प्रभाकर नागरे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 
तसेच श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी श्लोक सचिन गिते याची किर्गिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय केटलबेल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल, तसेच वंश रुपेश जाट याची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वसंत वाणी व श्री. राजेंद्र कोहकडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments