गोदावरी कालव्याचे उन्हाळी आवर्तन तातडीने सोडावे... विठ्ठलराव शेळके



राहाता तालुका प्रतिनिधी 

गोदावरी कालव्याचे उन्हाळी आवर्तन तातडीने सोडावे अशी मागणी नासिक पाटबंधारे विभागाचे अभियंता शहाणे मॅडम यांच्या कडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी म्हटले आहे निवेदनात म्हटले आहे की यावर्षी उन्हाळ्याची तिर्वता वाढली आहे लाभक्षेत्रातील शेतातील ऊभे पिके जळत आहे तरी ताबडतोब आर्वतन सोडावे लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी मागील पाणीपट्टी भरली व सातनंबर अर्ज भरले आहे शिवाय यावर्षी धारणा धरण समुहातील सर्व धरणांमध्ये भरपूर पाणी साठा आहे.

 तरी देखील पाटबंधारे विभाग यांच्या कडून नियोजन होत नाही यामुळे गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकरी नाराज असल्याचे मत विठ्ठलराव शेळके यांनी मांडले आहे धरणात पाणी असुन पिके जळत असतील तर काय उपयोग ब्रिटिश सरकारने हे धरणे केवळ शेतीसाठी बांधली परंतु आपले सरकार मोठ्या कंपन्या शहरात देत असेल तर यापुढे अन्याय सहन करणार नाही यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व लाभक्षेत्रातील मोठे आंदोलन छेडतील कालवा सल्लागार समिती वर लोकप्रतिनिधी साखर कारखान्याचे प्रतिनिधी आहेत त्यांचे शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नाही तरी पुर्वी सारखे प्रत्येक शेक्शन मधील लक्ष देणारे प्रतिनिधी कालवा सल्लागार समिती वर शेतकरी प्रतिनिधी घ्यावे अशी मागणी शेतकरी बंधू होत आहे.

Post a Comment

0 Comments