दिलीप शिंदे
सोयगाव दि.१७-- सोयगाव तहसील कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या गौण खनिज माफिया ठेकेदारांकडून शासकीय नियमाप्रमाणे दंड वासून करण्यात यावा अशी मागणी सोयगाव तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्याकडे दि.१६ गुरुवारी बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ता हरिभाऊ पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.यामुळे गौण खनिज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तहसील कार्यक्षेत्रातील फर्दापूर -नागद व नांदगाव तांडा ते पाचोरा या दोन्ही रस्त्यांच्या काँक्रिट करणाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या डबर,मुरुम, माती या गौण खनिजांचे सोयगाव तहसील कार्यक्षेत्राच्या विविध गटातून तसेच विविध गावांच्या हद्दीतून अवैध गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन करून गौण खनिजांची अवैध वाहतूक असंख्य वाहनातून विना परवाना रात्रंदिवस बेफाम पणे वाहतूक करण्यात येत आहे.
आपल्या कार्यालयातून गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी काढण्यात आलेल्या गौण खनिज वाहतूक परमिट मध्ये नमूद केलेल्या वाहनाचे क्रमांक नोंदविण्यात आलेले नाही त्यामुळे भरमसाठ वाहनातून बेकायदेशीर गौण खनिजांची बेकायदेशीर उचल करून वाहतूक करण्यात येत असल्यामुळे शासनाच्या करोडो रुपयांच्या महसुलाची चोरी आपल्या समक्ष करण्यात येत आहे.त्या करिता आपल्या कार्यालयातून गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी काढलेल्या परवानग्यात (परमिट मध्ये) गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनाचे आरटीओ रजिस्टर असलेले नंबर्स दर्शविण्यात आले नसल्यामुळे असंख्य वाहनातून विना परवाना अवैध गौण खनिजाची भरमसाठ वाहतूक बेकायदेशीर पणे रात्रंदिवस जोमाने सुरू आहे. या गंभीर प्रकरणाकडे आपल्या महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळे झाक पणा केलेला स्पष्ट पणे दिसून येत असल्यामुळे सदरची जनहितार्थ तक्रार दाखल करण्यात येत आहे. जनहितार्थ तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित गौण खनिज माफिया ठेकेदारांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.ज्या गटातून,ज्या भागातून संबंधित रस्त्याच्या कामासाठी गौण खनिज उत्खननासाठी परवानगी देण्यात आली आहे त्या ठिकाणचा शासकीय पंचासमक्ष पंचनामा करून अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांवर शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रती ब्रास चा शासकीय दंडाची आकारणी करून शासनाचा बुडालेल्या महसुलाची दंडनीय वसुली करण्यात यावे असे बल्लाळेश्वर युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा माहिती अधिकार सक्रिय कार्यकर्ता हरिभाऊ पाटील यांनी तहसीलदार यांना गुरुवारी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तहसीलदार या प्रकरणी काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments