अतिवृष्टीत बाधित नुकसानीचे अनुदान पासून वंचित शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार -- पुष्पा काळे




दिलीप शिंदे
सोयगाव दि.१६-- सोयगाव तालुक्यातील सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खचलेल्या व वाहून गेलेल्या पाच गावातील खरडुन गेलेल्या शेत जमिनीचे पंचनामे त्रिसदस्यीय समितीच्या स्वाक्षऱ्या न घेताच दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे यांनी शेतकऱ्यांसह सोयगाव तहसील कार्यालयात दुपारी तीन वाजता दिलेल्या भेटी दरम्यान उघडकीस आल्याने दि.१६ गुरुवारी संबंधित तलाठी, कर्मचारी, तहसीलदार आणि बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. 

दरम्यान १४० बोगस पंचनाम्यामुळे खरोखर शेत जमिनी खरडून वाहून गेलेल्या पात्र शेतकरी या बोगस पंचनाम्या मुळे मदतीपासून वंचित राहिले आहे. तालुक्यातील पाच गावात महसूल ने बोगस पंचनामे करून खऱ्या लाभार्थ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे याबाबत चे सर्व पंचनामा संचिका घेवून महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे दाद मागणार असून नुकसानी पासून वंचित शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. बैठकीदरम्यान नुकसानी पासून वंचित शेतकऱ्यांना आपल्या स्तरावरून मदतीसाठी प्रयत्न करावे अशा सूचना तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांना दिल्या. सामायिक क्षेत्राचे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे नुकसानीचे अनुदान आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांनी सांगितले. बैठकी दरम्यान अतिवृष्टीत बाधित शेतकरी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे,सुनील गावंडे,मयुर मनगटे आदी उपस्थित होते. बोगस पंचनामे करून खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तहसीलदार काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments