‌भिडे वाडा चित्ररथाचे लोहगाव येथे स्वागत.

लोहगाव (वार्ताहर)


 महाराष्ट्रात ११ एप्रिल २०२६ ते दिनांक ११ एप्रिल २०२७ हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे जन्म द्वीशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राहाता तालुक्यातील लोहगाव येथे येवला येथून आलेल्या भिडे -वाडा चित्ररथाचे इनामके वस्ती लोहगाव येथे मान्यवर, ग्रामस्थ व महिला यांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले. 

यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. भारतातील पहिली मुलींची शाळा या चित्ररथाचा उद्देश मुलींच्या शिक्षणासाठी प्रतिसाद मिळावा. सर्वसामान्य घरातील मुलं-मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, शिक्षणाविषयी जनजागरण व्हावे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व ओबीसी घटकातील गरीब कुटुंबातील मुलांना त्याचा लाभ मिळावा. क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण व इतर संपूर्ण कार्याची माहिती नवीन पिढीला अवगत व्हावी. हा उद्देश खरंतर भिडे वाडा चित्ररथाचा आहे. हा चित्र रथ संपूर्ण महाराष्ट्र भर फिरणार आहे. या चित्ररथाचे प्रत्येक तालुक्यात जंगी स्वागत करण्यात येत आहे.चित्ररथाच्या स्वागतासाठी बाभळेश्वरचे मा. सरपंच राजेंद्र म्हस्के, विखे कारखान्याचे मा.संचालक भाऊसाहेब चेचरे, लोहगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे, महात्मा फुले समता परिषदेचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, सरचिटणीस संजय इनामके, किशोर गिरमे रमेश गिरमे, राजेंद्र इनामके, रणजीत इनामके, सुजल इनामके, उद्योजक योगेश म्हस्के, किशोर तुरकणे, ॲड .आशिष गिरमे,ऋषभ इनामके,अक्षय इनामके, किरण गिरमे, दिलीप इनामके. दत्तात्रय चेचरे, प्रभाकर चेचरे,, गणेश चेचरे आदी समता बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या .

Post a Comment

0 Comments