टाकळीभान प्रतिनिधी:- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र नानासाहेब कोकणे यांची राष्ट्रवादी किसान सेल सभा अहिल्यानगर उत्तर विभाग जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. व त्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रभारी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य माजी आ. लहू कानडे यांच्या हस्ते नुकतेच निवड पत्र पदान करण्यात आले.
त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष(अजित पवार गट) व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रभारी सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस माजी आ. लहू कानडे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा प्रांत अध्यक्ष ॲड वसंतराव मनकर , शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड अजित काळे,अहिल्यानगर शेतकरी संघटनेचे प्रभारी व प्रवक्ते प्रा. कार्लस साठे सर, प्रा. जयकर मगर, काकासाहेब डिके, श्रीधर गाढे, विश्व धावपटू भाऊसाहेब गव्हाणे, आदींनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल कोकणे यांचे गावातील मान्यवर, पदाधिकारी व शेतकरी बांधव ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
चौकट: आ.लहू कानडे साहेबांनी राजेंद्र कोकणे यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची पद्धत शेतकऱ्यांसाठी केलेले विविध आंदोलने, शेतकरी बांधवांप्रती असलेली असलेली तळमळ याची दखल घेऊन वरिष्ठाकडे सदर पदाबाबत त्याची शिफारस करून त्यांना निवडपत्र देण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व राजेंद्र कोकणे मित्र मंडळ यांनी माजी आ. कानडे व वरिष्ठांचे आभार मानले आहे.
चौकट: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पक्षाची ध्येय धोरणे, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा मजबूत करण्याचे प्रयत्न केले जाईल ... राजेंद्र कोकणे (नूतन राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल सभा जिल्हाध्यक्ष ,अहिल्यानगर)
0 Comments