राहाता तालुक्यातील राजुरी येथील हौसाबाई दादा गोरे यांचे नुकतेच वयाच्या 103 व्या वर्षी दुःख निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना जावई नातवंडे नातजावई, नाती असा मोठा परिवार असून जगन्नाथ गोरे व नानासाहेब गोरे यांच्या त्या मातोश्री तसेच राहाता तालुका शिवसेना तालुका अध्यक्ष सोमनाथ गोरे पाटील यांच्या त्या आजी होत. त्यांच्यावर राजुरी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच शिर्डी मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील,श्रीरामपूर तालुक्याचे तालुकाप्रमुख लखनजी भगत,जिल्हा उपप्रमुख अनिल बांगरे पाटील आदी मान्यवरांनी भेट देऊन गोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
0 Comments