शिर्डी ( प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात सिद्धार्थ नगर येथे साजरी करण्यात आली.
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने 14 एप्रिल रोजी सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे सिद्धार्थ तरुण मंडळाचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते जयजयकार करत पूजन करण्यात आले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सिद्धार्थनगर येथे 14 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते एक या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरा करता सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन म्हस्के, उपाध्यक्ष दीपक लिहिणार तसेच श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे संचालक रवींद्र गायकवाड, सिद्धार्थ तरुण मंडळाचे सिद्धार्थ बनकर, दीपक बनकर ,अभय भालके, अनिल बनकर, सागर त्रिभुवन ,पार्थ गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरा करता श्री साईनाथ रक्तपेढी शिर्डी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिरा करता डॉक्टर भारती सर, टेक्निशियन सागर सर, श्री लुटे सर, श्री आवळे सर, सिस्टर लीना गमे, मदतनीस श्री शशिकांत गायकवाड ,अमोल देवकर, निलेश मोरे आदींचे मोठे सहकार्य लाभले. यावेळी सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन म्हस्के तसेच श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे संचालक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तुत्व,महान होते. त्यांच्या विचारांचाच आदर्श घेऊन त्यांच्या जयंती निमित्ताने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. असे सांगितले. जयंतीनिमित्ताने हा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांचे व श्री साईनाथ रक्तपेढीच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे यावेळी संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व युवक , ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.!
0 Comments