माळवाडगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी



माळवाडगांव ( वार्ताहर) माळवाडगांव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


        फटाक्यांचा आतषबाजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पुजन करण्यात आले. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनीनी डॉ बाबासाहेब यांच्या जीवनावर भाषण,नॄत्यगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी माळवाडगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश लोंढे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुंतोडे, ग्रामविकास अधिकारी दुधाळ, पोलीस हे.कॉ.शेख,ग्रामपंचायतीचे उपसरपंच शाम आसने, सदस्य सुरेश आसने, विठ्ठलराव आसने, उत्तमराव आसने, नानासाहेब आसने, रावसाहेब काळे, जगदिश मोरे, आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन नरोडे,तान्हा खताळ,अजिम शेख, अनिल कसबे, सोमनाथ नरोडे,शुभम बाबर, सागर कसबे, बाबासाहेब कसबे पप्पू आढाव आदिंनी प्रयत्न केले, सुत्रसंचलन मंगेश साळवे यांनी तर आभार किरण नरोडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments