या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणी करून आवश्यकतेनुसार चष्मे दिले जाणार असून, मोतीबिंदू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी या शिबिरात लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पासपोर्ट फोटो, आधारकार्ड व रेशनकार्डसह उपस्थित राहावे, असे आवाहन साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी केले आहे. या शिबिरासाठी नोंदणी शिबिर स्थळी करण्यात येईल समक्ष हजर असणाऱ्यांनाच तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात येतील तपासणीमध्ये मोतीबिंदू आढळल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल तरी गरजूंनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ०२४२३-२५८५५५. या नंबर वर संपर्क करण्याचे एका पत्रकांन्वये सांगण्यात आले आहे.
0 Comments