दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९--अजिंठा डोंगरा लगतच्या तोंडापूर धरणाच्या वरील भागात शेतकऱ्यांनी शेतातील पाला पाचोळा जाळल्यानें चिंगारी उडून लगतचा डोंगर तथा राखीव वन क्षेत्रात दि.०८ बुधवारी रात्री वनवा पेटला. हवेने आग पसरली.
तोंडापूर येथील निसर्ग प्रेमी भूषण कानडजे यांनी ही बाब सिल्लोड येथील अजिंठा डोंगराच्या संवर्धनाचे कार्य करणारे डॉ. संतोष पाटील यांना कळवली. डॉ. पाटील यांनी जामनेर वन विभागाची मदत घेत भूषन कानडजे यांच्या सह ही आग वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आवारे, दोन वन रक्षक, कर्मचारी यांच्या मदतीने ब्लोवर मशीन च्या सहाय्याने ही आग रात्री १२ वाजेच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात यश आले. साग, गवत मोई, अंजन इत्यादी झाडांचे ०५ ते ०७ हेक्टरचे यात नुकसान झाले. मात्र हजारो झाडे वाचवण्यात यश आले. शेतकऱ्यांनी बांध पेटवू नये, मोह जमा करतांना झाडा खाली आगी लावल्या जातात त्यामुळे ही असे वणवे पसरतात. मानवाने किती ही प्रयत्न केला तरी आपण जंगल निर्माण करूच शकत नाही, जंगल ही राष्ट्रीय संपत्ती असून लाखो वन्य जीवांचा यात अधिवास असतो, म्हणून आहे ते टिकवणे इतकेच आपण कार्य निसर्ग रक्षण व राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करावे असे आवाहन सोयगाव वन विभागाच्या कमेटीचे स्वीकृत सदस्य व वन्यजीव संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी केले आहे.
0 Comments