लोणी पोलिसांनी ममदापूर येथे एका कत्तलखाण्यावर छापा टाकत केली मोठी कारवाई!सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त!

शिर्डी( प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील ममदापूर गावात एका कत्तलखान्यावर लोणी पोलिसांनी छापा टाकत मोठे कारवाई केली असून सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांना गोपनीय माहिती या संदर्भात मिळाल्यानंतर त्यांनी लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना तसेच सूचना केल्या व या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर संजय विखे ,पोलीस अंमलदार साईनाथ राशिनकर ,पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश मकासरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल डोलनार, गिरी, सातपुते, होमगार्ड हारदे,व म्हसे यांच्या पथकाने त्वरित वरिष्ठांच्या आदेशानुसार राहता तालुक्यातील ममतापूर गावात जाऊन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तेथे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकत 
 ही कारवाई केली .या कारवाईत लोणी पोलीस स्टेशन च्या पथकाने घटनास्थळी असणारी सुमारे चार लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार व त्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये किंमतीचे 600 किलो गोमांस, तसेच दोन लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इको कार व त्यामध्ये 80 हजार रुपये किंमतीचे 400 किलो गोवंश मांस असे एकूण सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 तसेच घटनास्थळी आयान जब्बार कुरेशी( वय 21 वर्ष) राहणार ममदापूर तालुका राहता यास पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात लोणी पोलीस स्टेशनला पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 158/ 2026 बी एन एस 325/ 3( 5) 351( 2 )351 (3) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारित कायदा 2015 चे कलम पाच 5 (ब) 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने व श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वरील नियुक्त पोलीस पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास लोणी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments