श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर परमहंस आश्रमाचे श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशीकानंदजी महाराज सरस्वती यांच्या प्रेरणेने येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 14 ते 21 एप्रिल या दरम्यान दररोज काकडा भजन ,श्री विष्णुसहस्रनाम, सकाळी सात ते अकरा श्री साईसतचरित्र पारायण, दुपारी दोन ते पाच या वेळेत ह भ प लहू महाराज कराळे यांची भागवत कथा, त्याचप्रमाणे दररोज प्रवचन हरिपाठ व सायंकाळी 9 ते 7 हरिकीर्तन आदी कार्यक्रम संपन्न झाले. ह भ प भाऊसाहेब डांगे व हभप दौलत महाराज डुंबरे ,हभप सुधाकर महाराज मुंगसे गुरुजी, हभप ओंकार महाराज बोचरे, ह भ प अमोल महाराज शेलार, ह भ प अशोक महाराज आहेर, व दादासाहेब महाराज गायकवाड, ह भ प सूर्यवंशी महाराज यांचे प्रवचन तर हभप गणेश महाराज डोंगरे, हभप हर्षद महाराज, ह भ प राहुल महाराज डुंबरे ,हभप शिवाजी महाराज गायके, धर्मवीर ह भ प रमेश महाराज क्षिरसागर, ह भ प रामनाथ महाराज शास्त्री ,ह भ प विश्राम महाराज ढमाले यांचे या कालावधीत कीर्तन झाले. तर महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज यांचे मंगळवार 21 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते 11 या वेळेत काल्याचे सुश्राव्य असे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला व या अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता झाली.
या कालावधीत सर्व धार्मिक कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. या काळात सहकार्य करणारे ह भ प अंकुश महाराज,हभप अभिषेक महाराज थोरात, व सर्व मृदंगाचार्य, गायनाचार्य ,विणेकरी ,चोपदार नवनाथ थोरे व इतर चोपदार, भजनी मंडळ, तुलसी सेवा देणाऱ्या महिला व महाप्रसाद देणारे वाकचौरे परिवार तसेच सर्वच सहकार्य करणाऱ्यांचे श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था आजी-माजी विद्यार्थी वृंद यांच्यावतीने धन्यवाद मानण्यात आले.
0 Comments