सोयगाव तालुक्यातील पोहरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहित साजरी --



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२४-- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.२३ गुरुवारी रात्री सोयगाव तालुक्यातील पोहरी येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते समाधान खैरनार,अरुण आहेर,नानाभाऊ मोरे बापू निकम या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पहुरी गावात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सजवलेल्या रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.

 ढोल ताशांच्या गजर व लेझीम पथकाचे सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले होते.गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थानी पाणी, शरबत व फुलांचा वर्षावाने मिरवणुकीचे स्वागत केले. ग्रामस्थानी सामाजिक ऐक्य, समता व बंधुभावाचा संदेश दिला. दीपक मगर,निलेश मगर, हिराबाई मोरे, जिजाबाई निकम, तायाबाई मोरे, छायाबाई मोरे, ज्योताबाई मोरे, नाना मोरे, सुनिल मोरे, बापु निकम, नवल मोरे, गोपाळ मोरे, आबा मोरे, मागु मोरे, ऊखा मोरे, रमेश मोरे, दादा मोरे, आशोक मोरे, नामदेव मोरे, साडु मोरे, रतन मोरे, लखन मोरे, धना मोरे, रामकृष्ण मोरे, प्रकाश मोरे, दिपक सोनवने, सिद्धार्थ मोरे, विशाल सोनवने
 आदींसह ग्रामस्थ व महिला मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments