दिलीप शिंदे
सोयगाव दि.१६-- गत वर्षी एप्रिल महिन्यात पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निरपराध भारतीय व्यक्तींवर अतिरेकी हल्ला करून त्यांची हत्या करून २६ माता भगिनीं यांचे सौभाग्य म्हणजे सिंदूर पुसले. त्या माता भगिनीं व देशास न्याय मिळावा म्हणून पाकिस्तान व दहशतवादि यांच्या विरोधात यशस्वी असे ऑपरेशन सिंदूर राबवले
.त्या विजयाचे व भारत मातेच्या सौभाग्याचे प्रतीक म्हणून देशात सर्व प्रथम सिल्लोड येथील वृक्ष संवर्धक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची पर्यावरण विभागाचे दायित्व असेलेले डॉ. संतोष पाटील यांनी केळगाव येथील शहिद स्मारका जवळ जैव विविधतेच्या दृष्टीनेही महत्वाचा असलेला सिंदूर वृक्ष रोपण केला. याची वार्ता प्रसार माध्यमातून देशभर झाल्या नंतर पाच जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संघाच्या माध्यमातून रोपं देण्यात आले ही दिल्लीत हाच वृक्ष मोदी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी रोपण केला. जारूळ वृक्षाचे फुलं हे आपल्या राज्याचे राज्यपुष्प व हरीत मानचिन्ह आहे. जारूळ व सिंदूर या दोन्ही वृक्षांवर खुप मोठी फुलपाखरे, कीटक ई.जैवविविधता विसंबून असल्यामुळे या दोन्ही झाडांचे गुरुवारी पंचायत समीती च्या प्रांगणात जिल्हाधिकारी विनय गौडा,उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण,तहसीलदार संजय देवराये,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व वृक्ष प्रेमी रत्नाकर पगार,भाजप प्रदेश चिटणीस सुरेश बनकर, उपसभापती भगवान आहेर, ही संकल्पना राबविणारे डॉ. संतोष पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे व भाजपाचे पदाधिकारी,कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे रोपण करण्यात आले.
--------------------------------------------------------- प्रतिक्रिया:-- प्रत्येक शाळेच्या आवारात, शासकीत कार्यालये येथे जारूळचे रोपण केले जाईल.या राज्यपुष्पाचा दर्जा व राज्याचे हरीत मानचिन्ह असलेल्या या सुंदर झाडाचे या 5 जून नंन्तर शालेयसत्र सुरु झाल्यावर राज्यास भूषणावाह असे कार्य आपणास करायचे आहे.
रत्नाकर पगार, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सिल्लोड
--------------------------------------------------- प्रतिक्रिया:-- रंगाच्या पलीकडे सिंदूर - मॅन फेस बग नामक कीटक या सिंदूर वृक्षाच्या फळांच्या टरफलावरील तंतू खातो, तर लॉबस्टार नामक पतंग या पानांवर अधिवास करतो. लाखेच्या किटकाचाही यावर अधिवास आधळतो.
डॉ. संतोष पाटील, सोयगाव - सिल्लोड.
0 Comments