हनुमंतगाव(वार्ताहर) - राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील जागृत देवस्थान तसेच ग्रामदैवत बिरोबा महाराज यात्रोत्सव २५,२६ व २७ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर अहिरे तसेच उपाध्यक्षपदी दिपक घोलप तसेच खजिनदारपदी विकास अनाप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दि.७ एप्रिल मंगळवार रोजी यात्रोत्सव समिती गठित करून अध्यक्ष अहिरे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.यावेळी नारळाच्या कार्यक्रमासाठी गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.बिरोबा महाराज यात्रोत्सव बैठक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली.हि यात्रा तिन दिवस चालणार असून दि.२५ एप्रिल रोजी संध्याकाळी रात्री ८ वा. महाराष्ट्र फेमस कलाकार भुजबळ यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे.दुसऱ्या दिवशी दि २६ एप्रिल रोजी मानाच्या काठीची मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर पवित्र गंगाजलाने बिरोबा महाराज व इतर देवतांना स्नान घालून अभिषेक व पूजा करण्यात येईल.रात्री ८ वाजता आरती व डफाची मिरवणूक व त्यानंतर शोभेच्या दारूगोळ्याची आतिषबाजी होईल.तसेच रात्री ९ वाजता लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे.तिसऱ्या दिवशी दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता जंगी कुस्त्यांचा हगामा रंगणार असून यावेळी नामांकित कुस्ती पटूच्या कुस्त्या यावेळी होणार आहेत.तसेच महाप्रसादाचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे.
तरी यात्रेकरिता सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे व यात्रा सुरळीत पार पाडण्यास यात्रा कमिटीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. बिरोबा मंदिर येथे आयोजित केलेल्या बैठकीस प्रवरा कारखान्याचे संचालक,ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी,
ग्रामस्थ,बिरोबा मंदिर कमिटी सदस्य,तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments