वैजापूर तालुक्यातील भऊर येथील शेतकरी पुत्र चि.विशाल जगताप यांची ISRO मार्फत हैदराबाद सहलीसाठी निवड!सर्व क्षेत्रातून होत आहे त्याचे अभिनंदन!



शिर्डी (प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील राजकीय, अध्यात्मिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे भऊर गाव आजही तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात एक सर्वच दृष्टीने पुढलेले गाव समजले जाते.

 वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भऊर हे छोटे गाव पण पुर्वी पासुन सुजलाम व सुफलाम असून श्री रोकडेश्वर हनुमान महाराज या देवस्थान मुळे ते आणखीनच एक प्रसिद्ध असे श्रीक्षेत्र झाले आहे. या गावाचे आधारस्तंभ ॲड श्री प्रमोद दादा जगताप यांच्यामुळे‌ ते तालुक्यातील राजकारणात व हभप श्री संजयजी महाराज यांच्यामुळे अध्यात्मिक क्षेत्रात सर्वदूर पोहोचले आहे. अशा या छोट्या व ग्रामीण श्रीक्षेत्र भऊर गावातील व तेही जि.प.प्रा.शाळेत इयत्ता ८ वी मध्ये शिकत असणाऱ्या कु.विशाल अर्जून जगताप या विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे गावाचे नाव उज्वल केले आहे. या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद छ.संभाजीनगर राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत परराज्यात हैदराबाद सहलीसाठी निवड झालेली आहे. हि सहल दि.२४ ते २७ मार्च या कालावधीत असणार आहे.
 त्याची या शैक्षणिक सहलीसाठी झालेली निवड बघून त्याचेवर शाळा व गावाबरोबरच बाहेरून व सर्व क्षेत्रामधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनंदन होत आहे. या विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे येथील जि.प.शाळेच्या वतीने त्यांचा छोटेखानी सत्कार नुकताच ठेवण्यात आला होता. त्याचा हभप संजयजी महाराज जगताप यांच्या हस्ते व ॲड प्रमोद दादा जगताप यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना छ.संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मा.सभापती ॲड श्री प्रमोद दादा जगताप यांनी सांगितले की, चि.विशाल जगताप हा एक जिज्ञासू विद्यार्थी असून विशेष म्हणजे तो एक शेतकरी पुत्र आणि त्यातूनच तो मराठी शाळेत शिकत आहे आणि मराठी शाळेत होणाऱ्या वेगवेगळ्या परिक्षेत नेहमीच तो पुढेच असतो आणि त्याची निवड होणे .ही गौरवशाली गोष्ट असून त्याने वेगवेगळ्या परीक्षेत यशस्वी होत दाखवून दिले की,खऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही ठिकाणी यश प्राप्त केले तर तेथेच न थांबता अजूनही त्या पुढील स्वप्न उराशी बाळगायचे असते असे ॲड श्री प्रमोद दादा जगताप यांनी सांगितले .तर यावेळी 
 भऊर गावाचे भुषण व श्रद्धास्थान आणि प्रसिद्ध कीर्तनकार हभप श्री संजयजी महाराज जगताप यांनी सांगितले की, बाल विशाल म्हणजे तो भावी तरुण आहे आणि तरुण म्हणजे जो आपला परीवार, गावा बरोबरच या देशाला व समाजाला तारून नेण्याचे स्वप्न बघतो. तसंच आज-बाल विशाल पुढे तरुण- विशाल होणार आहे. व तो आपली शाळा गावाचे सर्व देशभर नेणार आहे.चि.विशालची निवड ही आपल्या गावासाठी व आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असून विशाल म्हणजे आमच्याच तालमीतील बाल वारकरी असून तो शाळेत तर हुशार आहेतच मात्र तो धर्मिक क्षेत्रातही पुढे आहे. भजनात पखवाज वाजविण्यात देखील तो परीपूर्णपणे निपुण झालेला आहे. दररोज पूजाअर्चा व नित्यनेमाने अभ्यास करणारा असा हा विशाल वयाने लहान असला तरी नावाप्रमाणे खरंच विशाल असा आहे.आणि भगवान परमात्मा त्याला पुढील यशाची शिडी चढण्यासाठी बळ देवो, असे शुभाशीर्वाद आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संजीवनी रूरल एज्युकेशनचे विश्वस्त मा श्री सुमित दादा कोल्हे, संचालीका सौ.निकीता दिदी कोल्हे, श्री योगेश जगताप,Hod सिव्हिल संजीवनी त्याचबरोबर अ,नगर जिल्हा मध्यवर्ती बँकचे शाखाधिकारी श्री संभाजीराव जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बाबासाहेब जगताप, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्वश्री कल्याणराव जगताप, श्री राजसाहेब जगताप व इतर मान्यवरांनीही त्याच्या या निवडीची प्रशंसा व अभिनंदन केले आहे. शाळेतील या सत्कार कार्यक्रमाला सर्व शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments