येडूमातेची मानाची काठी पिंपळदरी कडे रवाना तळपत्या उन्हात करणार पायी प्रवास

श्री क्षेत्र पिंपळदरी ( प्रतिनिधी)

श्री क्षेत्र  पिंपळदरी येथील येडूमातेच्या यात्रेला काही दिवस शिल्लक राहिले असताना आज राहता तालुक्यातील हनुमंतगाव येथून येडू मातेच्या मानाची काठी पिंपळदरीकडे मार्गस्थ झाली. एवढ्या तळपत्या उन्हात काठी घेऊन पायी पिंपळदरीकडे प्रवास करणार असल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.
       या मानाच्या काठीची हनुमंतगाव मध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच हनुमंतगाव‌ ते धानोरे घाट या ठिकाणी वाजत गाजत या काठीची मिरवणूक काढण्यात आली हनुमंतगाव येथील भिल्ल समाजासह इतर नागरिकही मोठ्या संख्येने मिरवणूकी मध्ये सहभागी झाले होते. देवीच्या गाण्याने हनुमंतगाव परिसर दणाणून गेला होता. आदिवासी रुडी परंपरेनुसार या काठीला सजवण्यात आले होते. सप्तरंगी कापडाने ही काठी सजवण्यात आली होती. अतिशय अवाढव्य असणाऱ्या या काठीच्या उंचीकडे बघून उपस्थितही आवक झाले होते. आदिवासी महिला डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या हनुमंतगावातुन निघालेली ही मिरवणूक धानोरे घाट येथील अंबिका मातेच्या मंदिरात जाऊन समाप्त झाली. रात्रभर या काठीचा मुक्काम धानोरे घाटावर राहिल्यानंतर ‌सकाळीच ही काठी घेऊन आदिवासी पिंपळदरीकडे पायी मार्गस्थ होणार आहेत.जवळपास तीन दिवस तळपत्या उन्हात चालत ही काठी यात्रेच्या दोन दिवस अगोदर पिंपळदरी मध्ये दाखल होणार आहे. हनुमंतगाव‌ येथील मानाच्या काठीला यात्रेत विशेष महत्त्व दिले जाते व पूजन केले जाते. त्यामुळे रस्त्याने जाताना प्रत्येक गावात या काठीची विधिवत पूजा केली जाते. येडू मातेची यात्रा 3 एप्रिल रोजी भव्य दिव्य अशा स्वरूपात भरत आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातून देवीच्या काठ्या पिंपळदरी कडे रवाणा झाल्या आहेत. एवढ्या भर उन्हात आदिवासी पायी पिंपळदरी कडे निघाले आहेत. यावेळी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, माजी सरपंच गोरक्षनाथ ब्राह्मणे, विकास अनाप, सुभाष ब्राह्मणे, बाळासाहेब पाबळे, सोपान मांढरे, सुजय पर्वत, अतुल कुलकर्णी, सनी अहिरे, अभिषेक अहिरे, अमोल अहिरे, गोरख अहिरे, जालिंदर अहिरे, तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments