टाकळीभान प्रतिनिधी:- रयत शिक्षण शाळेत घेतलेल्या चांगल्या शिक्षणामुळे आपण आज स्वतःच्या पायावर उभे असून शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करत असल्या बद्दलची भावना अर्जुन राऊत यांनी व्यक्त केली. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मित्र मंडळाच्या वतीने टाकळीभान न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पा. जुनिअर कॉलेजचे अहिल्यादेवी वस्तीगृह यातील मुलांना बैठक व्यवस्थेसाठी १२/१५ ची मोठी सतरंजी तसेच ५० विद्यार्थ्यांना ५० टॉवेल असे उपयुक्त साहित्य वाटप करून सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबवत वस्तीगृहातील मुलांना मदतीचा हातभार लावला. न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान येथे , साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीधर गाडे होते. व्यासपीठावर स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष राहुल पटारे, विद्यालय प्राचार्य शिंदे सर, प्रा. कार्लस साठे सर, मा.प्राचार्य जयकर मगर, पर्यवेक्षक जरे सर , सामाजिक कार्यकर्ते भैया पठाण, भाऊराव कोकणे ,काकासाहेब डिके, देवा पाबळे, सतीश रणनवरे, गणेश वखरे, अहिल्यादेवी वस्तीगृहाचे अधीक्षक सुरेश गलांडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा.कार्लस साठे सर , मा. प्राचार्य जयकर मगर यांनी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन राऊत यांनी राबविलेल्या वस्ती गृहातील मुलांना उपयुक्त साहित्य वाटप या उपक्रमाचे कौतुक केले. समाज घडवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या शैक्षणिक क्षेत्राला समाजातील दानशूर दात्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर गाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अभिनंदन केले. राहुल पटारे यांनी वस्तीगृहाला केलेल्या सहकार्याबद्दल राऊत यांचे धन्यवाद मानले व शैक्षणिक संकुलाच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत नलावडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जावळे यांनी केले तर आभार पाचपिंड मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाचपिंड सर,शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.
0 Comments