शिवभक्तीमध्ये “मी”पणाचा त्याग करून “तूच सर्व आहेस” अशी भावना ठेवली जाते.
नामस्मरण (ॐ नमः शिवाय)
ध्यान आणि जप
शिवलिंगाची पूजा
अभिषेक (दूध, जल, बेलपत्र अर्पण)
ही भक्ती मन शुद्ध करते आणि अहंकार कमी करते.तर
शक्ती म्हणजे आपल्या आत असलेली दिव्य ऊर्जा. हीच शक्ती कुंडलिनी रूपाने प्रत्येकामध्ये सुप्त असते.
ध्यान, प्राणायाम, आणि साधना यामुळे ही शक्ती जागृत होते
शिव म्हणजे चैतन्य आणि शक्ती म्हणजे ऊर्जा
जेव्हा भक्ती आणि शक्ती यांचा संगम होतो, तेव्हा साधकाच्या जीवनात चमत्कारिक बदल होतात. व या शिवभक्तीचे फळ मिळते व तसा साक्षात्कारही अनुभवायला येतो. मानसिक शांती आणि स्थिरता मिळते.
शिवभक्तीमुळे मनातील ताण, भीती आणि चिंता दूर होतात.
मन ,शांत आणि स्थिर होते.अहंकाराचा नाश होतो.
शिव म्हणजे वैराग्याचे प्रतीक. त्यांच्या भक्तीने स्वतः मधला “मी”पणा नष्ट होतो आध्यात्मिक प्रगती साधक हळूहळू आत्मज्ञानाच्या मार्गावर पुढे जातो.शिवभक्तीने मोक्षाचा मार्ग सुकर होतो.संकटांपासून संरक्षण होते.
शिवाला “भोलानाथ” म्हटले जाते . ते आपल्या भक्तांचे संकटांपासून रक्षण करतात.
इच्छांची पूर्तता (सात्विक इच्छा)होते.शुद्ध मनाने केलेली प्रार्थना शिव स्वीकारतात आणि योग्य ते फळ देतात.
फक्त भक्ती असेल पण साधना नसेल, तर ती अपूर्ण राहते.
आणि फक्त शक्ती (साधना) असेल पण भक्ती नसेल, तर अहंकार वाढू शकतो. म्हणूनच:
भक्ती म्हणजेच प्रेम आणि समर्पण व
शक्ती म्हणजे साधना आणि आत्मबल या दोन्हींचा समतोल साधला तरच पूर्णत्व प्राप्त होते.
शिवभक्ती ही आत्म्याला परमात्म्यात विलीन करणारी सर्वोच्च साधना आहे.
भक्ती आणि शक्ती यांच्या एकत्रित साधनेमुळे:
0 Comments