शेतकरी संरक्षण कायदा मसुदा या विषयावर अण्णा हजारे, यांच्याशी अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा - अजित काळे,

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी -राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची एडवोकेट अजित काळे उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी भेट घेऊन शेतकरी संरक्षण कायदा मसुदा या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा करून आपले विचार मांडले अण्णांनी त्यांचे म्हणणे अतिशय गांभीर्यपूर्ण ऐकून घेतले काळे साहेबांनी विनंती केली की आमचा हा मसुदा शासनाकडे पाठवून पाठपुरावा करावा कारण हा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

 शेतकऱ्यांना हमीभाव असेल रात्रीचे पाणी भरणे वन्य प्राण्यापासून संरक्षण करणे असेल व मार्केटिंगचे प्रश्न याविषयी अभ्यासपूर्ण चर्चा केली,
हा शेतकरी संरक्षण कायदा अतिशय महत्त्वाचा असल्याने जनजागरण करण्यासाठी व शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अण्णांनी सांगितले तसेच कांदा प्रश्नासंबंधी शेतकऱ्यांचे होत असलेले हाल त्यांचा मालाला जुजबी किंमत मिळत असल्याने तो प्रश्न देखील एडवोकेट काळे साहेबांनी मांडला याचा देखील विचार करण्याचे त्यांनी मान्य केले ,
    याप्रसंगी डॉ. मुकुंदराव गायकवाड डॉक्टर अशोक ढगे अशोक सब्बन यांनी शेतकरी संरक्षण कायदा मसुदा तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले ,तसेच या कायद्यासंबंधी त्यांनी देखील अभ्यासपूर्ण विचार मांडले ,
तसेच प्रा कार्लस साठे प्रभारी व प्रवक्ते शेतकरी संघटना अहिल्यानगर यांनी सद्यस्थितीतील शेतकऱ्यांची परिस्थिती व आर्थिक अधोगती याविषयी विचार मांडले, 
     याप्रसंगी साहेबराव चोरमल पोपटराव साठे कर्नाटकचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दयानंद पाटील, श्री मंजुनाथ प्रवरा संगम चे उपसरपंच नितीन भालेराव उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments