कमला एकादशी निमित्त अंजनाई गोशाळेत गोमातेचे पूजन ---




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२७-- तालुक्यातील आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचलित अंजनाई गोशाळेत कमला एकादशी निमित्त दि.२७ बुधवारी सायंकाळी श्रीकृष्ण यांच्या मूर्तीचे पूजन कृषीभूषण अरुण सोहनी यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर रामेश्वर बोडखे व बालीबाई बोडखे या जोडप्याच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात केले. कमला एकादशी या दिवशी गोमातेचे पूजन केल्यास अनंत पुण्य लाभते असे धर्मग्रंथात वर्णन आहे. गोमाता ही धर्म, संस्कृती, समृद्धी आणि मातृत्वाचे प्रतीक मानली जाते.

 गोसेवा व गोपूजन केल्याने ईश्वरकृपा प्राप्त होते. दरम्यान गो माता पूजन कार्यक्रमास कृषीभूषण अरुण सोहनी, संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे,उपाध्यक्ष ईश्वर इंगळे,सचिव दिलीप शिंदे,सहसचिव अनिल लोखंडे,कोषाध्यक्ष उर्मिला इंगळे, सदस्य ज्ञानेश्वर गाडेकर,अशोक ढगे, सदस्या पद्मा शिंदे,रुपाली लोखंडे, मीना गाडेकर, शारदा इंगळे, गोशाळा कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव, अनिता जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी,गो प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments