ट्रॅक्टर पलटी होऊन दोघा भाच्यांसह मामाचा दुर्देवी मृत्यू..

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी- नेवासा तालुक्यातील सोनई मधील दत्तनगर येथील दरंदले कुटुंबातील ०२ अल्पवयीन सख्ख्या भावांचा तसेच त्यांच्या मामाचा खरवंडी येथे ट्रॅक्टर अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे.

   दत्तनगर परिसरातील गणेश दरंदले यांची दोन मुले अभिषेक गणेश दरंदले (वय १६) व विजय गणेश दरंदले (वय १४) हे शाळेला सुट्टी असल्याने खरवंडी येथील मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्याकडे गेले होते. सायंकाळी खरवंडीकडे जात असताना ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॅक्टर पलटी झाले व त्याच्या खाली तिघेही गुंतल्याने तिघांचाही मृत्यू झाला. या दुर्देवी घाटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरंदले कुटुंबावर तर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments