राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक या गावचे लोकनियुक्त सरपंच ओमेश साहेबराव जपे यांना नुकताच शिर्डी येथे हिरोज ऑफ अहिल्यानगर हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार त्यांना मिळाल्या नंतर त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून, संघटनांकडून सत्कार तसेच सोशल मीडियावर भ्रमणध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामुळे आपणाला आणखी काम करण्याची मोठी प्रेरणा मिळेल असे सांगत हा पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकांचे व पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व अभिनंदन करणाऱ्या हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले आहेत.
सावळी विहीर बुद्रुक गावचे लोकनियुक्त सरपंच ओमेश साहेबराव जपे हे राहता तालुका पंचायत समितीचे उपसभापती होते. त्यानंतर सावळीविहीर बुद्रुक गावचे येथे विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत. उपसभापती असताना व सध्या विद्यमान सरपंच म्हणून त्यांनी उपसरपंच विकास जपे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गावचा विकास करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न चालवला आहे.अनेक योजना ,उपक्रम त्यांनी येथे राबवले असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दैनिक पुण्यनगरी समूहाच्या वतीने त्यांना नुकताच शिर्डी येथे हॉटेल सेंट लॉरेन्स मध्ये अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश व बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते हिरोज ऑफ अहिल्यानगर हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपसरपंच विकास जपे ,संजय जपे व इतर सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सरपंच ओमेश जपे यांचे विविध संघटना व मान्यवरांकडून सत्कार तसेच सोशल मीडिया व भ्रमणध्वनी द्वारे त्यांचे अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सरपंच ओमेश जपे यांनी हा पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकांचे तसेच पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनंदन करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहेत. सरपंच ओमेश जपे यांना यापूर्वीही नवी दिल्ली येथे व अहिल्यानगर येथे आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार मिळालेला आहे.
0 Comments