भिल्ल समाज ठरवील तोच राहुरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार होईल असे वक्तव्य एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी केले आहे.
श्री. अहिरे यांनी म्हटले आहे की राहुरी विधानसभा मतदारसंघात आदिवासींचे जवळपास ४५ हजार मतदार आहेत. आणि भिल्ल समाजाने आतापर्यंत ज्या उमेदवाराच्या पारड्यात मते टाकली तोच उमेदवार राहुरीचा आमदार झाला हा इतिहास सर्वांनाच माहित आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना एकलव्य भिल्ल सेनेने जाहीर पाठिंबा दिला होता आणि त्याचा परिणाम सर्व जनतेने निकालातून पाहिला. सध्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीची धामधुम सुरू आहे अनेक तथाकथित नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीच्या मैदानात उतरले आहेत. परंतु भिल्ल समाजाला विचारात घेतल्याशिवाय कोणताही उमेदवार राहुरी चा आमदार होणार नाही याचा त्यांना विसर पडला असावा. कोणताही पक्ष भिल्ल समाजाला विचारात घ्यायला तयार नाही याचा परिणाम निकालावर निश्चित दिसेल हे सर्वांनीच ध्यानात घ्यावे. लवकरच एकलव्य भिल्ल सेनेच्या पदाधिकाऱ्यांची राहुरी येथे बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. त्यामध्ये कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की एखादा वेगळा निर्णय घ्यायचा याचा फैसला होणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने भिल्ल समाजाला गृहीत धरू नये. आणि ज्या उमेदवाराने भिल्ल समाजाला गृहीत धरले तो उमेदवार पराभूत झाला हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे.तेव्हा या मतदारसंघांमध्ये भिल्ल समाजाची ताकद खूप मोठी आहे. आणि हे सर्वांना माहित असतानाही प्रत्येक जण भिल्ल समाज आपल्याबरोबरच आहे असे सांगत फिरत आहे परंतु हे खरे नाही आत्तापर्यंत आम्ही कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही .
0 Comments