आदिवासींना विकास निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्रालयात जाऊन सत्कार करणार-ज्ञानेश्वर अहिरे

राहाता( वार्ताहर)

आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व उन्नतीसाठी ठोस पावले उचलून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मंजूर करणाऱे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार‌ राज्यातील भिल्ल समाजाच्या वतीने केला जाणारअसल्याचे सुतोवाच एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी केले आहे. 
         श्री. अहिरे यांनी म्हटले आहे की, राज्यातील आदिवासी भिल्ल समाजाची दयनिय‌‌ अवस्था झाली असून शासनाने विकासासाठी ठोस पावले उचली पाहिजेत असे निवेदन एकलव्य सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते.

 त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या विकासासाठी भरघोस निधी दिला जाईल असे आश्वासन दिले होते त्यानंतर राज्य सरकारने २०२६ च्या बजेटमध्ये आदिवासींसाठी हजारो कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून आदिवासींच्या विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. या निधीमुळे राज्यातील भिल्ल समाजाला स्वतःच्या मालकीचे घर होईल तसेच अनेक भूमीहिन कुटुंबांना स्वतःची शेतजमीन होणार आहे तसेच व्यवसायासाठी चार चाकी वाहने व शेती व्यवसायासाठी ट्रॅक्टर ट्रॉली, आदिवासी महिला बचत गटासाठी भरगोस निधी दिला जाणार आहे. मुलांच्या शैक्षणिक स्कॉलरशिप मध्ये 100% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी मुलांचे पदवीधरपर्यंतचे शिक्षण होण्यास खूप मदत होणार आहे . तसेच सुशिक्षित ‌बेरोजगारांसाठी वीट भट्टी व्यवसाय, किराणा दुकान, कापड दुकान, यासाठी ‌अनुदान स्वरूपात भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा अनेक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी शासनाने हजारो कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे आणि त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्यातील एकलव्य सेनेचे १४ जिल्हाध्यक्ष यांच्यासह मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांचा आदर सत्कार केला जाणार आहे .तसेच आदिवासींसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीमुळे राज्यातील आदिवासी भिल्ल समाजाची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होणार असून मोल मजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या भिल्ल समाजाची मुले शिक्षणाची वाट धरणार आहेत. तसेच महिलांना वैयक्तिक स्वरूपात व्यवसायासाठी शेळी मेंढी पालन करण्यासाठी ‌तसेच दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हशी यांचे वाटप केले जाणार असल्याने आदिवासी महिला स्वतःच्या पायावर उद्या राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानावे तितके थोडे आहे त्यामुळे राज्यातील भिल्ल समाजाने मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. असे सुतवाच ज्ञानेश्वर अहिरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments