दिलीप शिंदे
सायगाव दि.०८-- मराठवाडा व खानदेशाला जोडणारा शिंदोळ - नगरदेवळा रस्त्यावर झाडांच्या जाळ्या वाढल्याने दुचाकी,चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना वाहने सुरक्षितपणे चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. झाडाच्या जाळ्यांची साफसफाई करण्यात यावी यासाठी शिंदोळ येथील बोरसे सर मित्र परिवाराच्या वतीने पाठपुरावा केला जात होता.
अखेर या पाठपुराव्याला नगरदेवळा येथील प्रसिद्ध उद्योजक प्रणय उर्फ मुन्नाभाऊ भांडारकर यांनी वडगाव शिंदोळ ग्रामस्थांना मदतीचा हात पुढे करीत नगरदेवळा सिम - शिंदोळ रस्त्यालगत झाडांच्या जाळ्याची जेसीबी द्वारे साफसफाई करण्यासाठी निःशुल्क मदतीचा हात दिल्याने प्रसिद्ध उद्योजक प्रणय उर्फ मुन्नाभाऊ भांडारकर यांचे आभार मानले.यावेळी प्रणव मुन्ना भाऊ भांडारकर, विलास भामरे, आदित्य परदेशी, कडु दोघा पाटील, कडु पाटील, स्वप्निल चौधरी, बोरसे सर मित्र परिवार व शिंदोळ - नगरदेवळा सिम येथील नागरिक उपस्थित होते.
0 Comments