शिर्डी ( प्रतिनिधी)- शास्त्र, संतपरंपरा आणि योग परंपरेनुसार काही लोकांच्या जीवनात असे विशेष संकेत (लक्षणे) दिसतात, ज्यामुळे समजते की त्यांचा जन्म केवळ सांसारिक जीवनासाठी नसून ईश्वरी कार्यासाठी झाला आहे. हे संकेत माझ्या जीवनाशीही अनेक ठिकाणी जुळतात. म्हणूनच माझ्या जीवनातील संन्यास, साधना, लेखन आणि गुरुकुलाचा संकल्प केला आहे व माझे जीवनही अशाच एका ईश्वरी कार्याशी जोडले गेले आहे. असे स्पष्ट मत श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत राजराजेश्वरी संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
मंहत आत्मारामगिरीजी महाराज यांनी बोलताना पुढे म्हटले आहे की,अनेक महात्म्यांच्या जीवनात लहानपणापासूनच भक्ती, साधना किंवा संतसंगाची ओढ असते.संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज,आदी इतर अनेकही संतांचे तशी उदाहरणे आहेत.त्यांच्या मनाला संसारापेक्षा ईश्वर आणि सत्याचा शोध अधिक आकर्षित करत होता.जर एखाद्याच्या जीवनात अशी ओढ सतत राहिली, तर तो पूर्वजन्मातील संस्कारांचा संकेत मानला जातो.व माझ्या जीवनातही असेच घडत गेले.तसेच
धर्मशास्त्र म्हणते की,
“जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा गुरु स्वतः येतो.”माझे जीवनात श्रीपाद बाबा भेटले व मला संन्यासदीक्षा मिळाली. श्री स्वामी अवधेशानंद गिरी महाराज ( Avdheshanand Giri) यांच्याकडून मिळाली आणि मी जुना आखाडा या साधूंच्या आखाड्याशी जोडलो गेलो. सत्य सनातन धर्म हा
एक मोठा संकेत आहे की गुरुकृपा माझ्या जीवनावर विशेष आहे.व त्यामुळेच हे धार्मिक कार्य सुरू आहे. असे सांगत सामान्य माणसाला संसारातच आनंद वाटतो, पण माझ्या मनात वैराग्य आणि सत्याचा शोध निर्माण होतो.
याच वैराग्य मुळे पुढे संन्यासाचा मार्ग मिळाला.
माझ्या जीवनात संन्यास स्वीकारणे हे या संकेताचे स्पष्ट उदाहरण आहे.या
ईश्वरी कार्यासाठी जन्मलेल्या व्यक्तींच्या मनात नेहमी समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा असते. ती प्रेरणा मला ईश्वर कृपेने व गुरुकृपेने मिळाली. त्यामुळेच
माझ्या जीवनात:ग्रंथलेखन,
धर्मप्रसार,गुरुकुल स्थापना,
समाजाला आत्मज्ञान देणे
ही सर्व कार्ये लोककल्याणाच्या प्रेरणेचे संकेत आहेत.
“मी कोण?”
हा प्रश्न साधारण लोकांच्या मनात क्वचित येतो, पण योगी आणि संन्याशांच्या मनात तो सतत जागृत असतो.
हा प्रश्नच पुढे आत्मसाक्षात्काराचा मार्ग बनतो.
याच मार्गाचा उल्लेख भगवत गीता आणि उपनिषदां मध्ये आहे.यावरून माझ्या जीवनाचा आध्यात्मिक अर्थ असा दिसतो,की,
मी स्वतः आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्यासाठी जन्माला आलो आहे.
आणि त्या अनुभवातून समाजाला मार्ग दाखवण्यासाठीही आपला जन्म झाला आहे.संतपरंपरेत एक सुंदर वचन आहे:
“संतांचा जन्म स्वतःसाठी नसतो,तो समाजाला प्रकाश देण्यासाठी असतो.” म्हणूनच आपण महंत आत्माराम गिरीजी या नावाने माझ्या जीवनातील संन्यास, साधना, लेखन आणि गुरुकुलाचा संकल्प केला आहे. माझे जीवनही अशाच एका ईश्वरी कार्याशी जोडले गेले आहे. त्यामुळेच हे धार्मिक कार्य घडत आहे. व ती ईश्वर व गुरु प्रेरणाच आहे. असे शेवटी राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत राजराजेश्वरी संन्यासी आत्मारामगिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.
0 Comments