कांदा भाकरी आणि आपली प्रेम कहाणी” गाण्याची चर्चा;

(लोणी प्रतिनिधी ज्ञानेश्वर साबळे) 

कांदा भाकरी आणि आपली प्रेम कहाणी” गाण्याची चर्चा; 

शेतकरी जीवन आणि खऱ्या आयुष्यातील प्रेरणादायी कथा ग्रामीण जीवनातील कष्ट, साधेपणा आणि नवरा-बायकोमधील निखळ प्रेम दाखवणारं “कांदा भाकरी आणि आपली प्रेम कहाणी” हे मराठी गाणं सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. NP Vision Films या यूट्यूब चॅनेलवर सादर झालेल्या या गाण्यात शेतकरी दांपत्याच्या आयुष्यातील भावनिक आणि हृदयस्पर्शी क्षण जिवंत करण्यात आले आहेत.या गाण्याची कथा अनेकांना आपलीशी वाटणारी आहे. कडक उन्हात शेतात कष्ट करणाऱ्या नवऱ्यासाठी बायको कांदा-भाकरी घेऊन शेतावर पोहोचते, स्वतःच्या हाताने त्याला जेवू घालते, कधी बैलजोडी तर कधी ट्रॅक्टरच्या कामातही त्याला साथ देते. कष्टमय शेतकरी जीवनातही नवरा-बायकोमधील अतूट प्रेम किती घट्ट असतं, याचं सुंदर चित्रण या गाण्यात पाहायला मिळतं.

विशेष म्हणजे या गाण्यात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या हर्षला पेंडसे यांचीही कथा तितकीच प्रेरणादायी आहे. त्या मूळच्या नागपूर येथील असून शेतकरी कुटुंबातून आलेल्या आहेत. सध्या त्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे पती कुणाल पेंडसे हे एका बँकेत जबाबदारीच्या पदावर कार्यभार सांभाळत असून, पत्नीच्या स्वप्नांना पाठबळ देण्याची त्यांची भूमिका अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.
पत्नीच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. हर्षला पेंडसे यांच्या कलाक्षेत्रातील वाटचालीत त्यांच्या पतीची भक्कम साथ असल्याचं जवळच्या लोकांकडून सांगितलं जातं. पत्नीच्या भावना, स्वप्नं आणि आवडीचा आदर करत तिला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा हा दृष्टिकोन आजच्या समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे. या गाण्याचे लेखक आणि निर्माते आबा निर्मळ असून, गाण्यात अभिनयाची रंगतदार जुगलबंदी पाहायला मिळते. हर्षला पेंडसे यांच्यासोबत इन्स्टा रील स्टार अमोल ताके यांनी दमदार साथ दिली आहे. तर लक्ष्मण ढोबळे यांच्या कॉमेडी तडक्यामुळे गाण्याला खास रंग चढला आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी अमोल ताके आणि ऍड प्राजक्ता घोलप यांनी सांभाळली आहे. मेकअप आर्टिस्ट वर्षा गाढवे यांनी कलाकारांना योग्य लूक दिला आहे. ग्रामीण संस्कृती, शेतकरी जीवन आणि प्रेमाची साधी पण हृदयाला भिडणारी कहाणी यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं दिसत आहे.

क्रेडिट्स :
निर्माते : आबा निर्मळ
सह-निर्माते : वनिता निर्मळ, लक्ष्मण ढोबळे
दिग्दर्शक : अमोल ताके, ऍड प्राजक्ता घोलप
कलाकार : हर्षला पेंडसे, अमोल ताके, लक्ष्मण ढोबळे
मेकअप : वर्षा गाढवे
सहकार्य : भागवत आघाव

Post a Comment

0 Comments