येडूआई पालखीचे पिंपळदरी गडावरून प्रस्थान

लोहगाव (वार्ताहर)

येडुआई अन्नदान पालखीचे श्री. क्षेत्र पिंपळदरी येथून एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे व आदिवासी बचाव समितीचे संस्थापक कैलास माळी यांच्या हस्ते पालखीची मनोभावे पूजा करून प्रस्थान करण्यात आले .
संपूर्ण राज्यातील भिल्ल समाजाचे आराध्य दैवत असलेल्या अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळदरी येथील येडु मातेच्या यात्रेला २
 एप्रिल रोजी मोठ्या भक्ती भावात सुरुवात होत असून संपूर्ण राज्यातून लाखो भिल्ल समाज या ठिकाणी यात्रे निमित्त उपस्थित राहणार आहे. यात्रे वेळी चार दिवस आदिवासी कुलदैवत येडूबाई अन्नछत्र सेवाभावी संस्थेच्या वतीने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी २४ तास अन्नदान केले जाते. त्या अनुषंगाने आज येडू आई गडावरून पालखीचे प्रस्थान करण्यात आले. ही पालखी संपूर्ण राज्यात फिरून यात्रेच्या दोन दिवस अगोदर‌ पिंपळदरी येथे दाखल होणार आहे. यावेळी प्रत्येक गावातून आदिवासी समाज गहू ,तांदूळ, गुळ, तेल, तसेच त्यांच्या इच्छेनुसार मदत करत असतो. या सर्व मदतीतूनच चार दिवस गडावर अन्नदान केले जाते त्यामुळे या पालखीला भिल्ल समाज भरभरून मदत करणार आहे. लाखो भिल्ल समाज या यात्रेसाठी उपस्थित राहणार असल्याने यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यावेळी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, आदिवासी बचाव समितीचे संस्थापक कैलास माळी, येडूबाई अन्नछत्र संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गांगुर्डे, राधाकृष्ण बर्डे, बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश माळी ,शिवाजी पवार ,रघुनाथ अहिरे, भाऊराव अहिरे, चंद्रकांत धिरोडे ,संजय गांगुर्डे ,सुरज ससे ,करण माळी ,परसराम माळी, संजय खुरसने, सौरभ सूर्यवंशी ,मिराबाई माळी ,भारती माळी ,सुगंधा दळवी, तनुजा शिंदे, सोनाली पवार, सुनिता खुरसणे ,ज्योतीताई निकम ,ज्योती गांगुर्डे ,अश्विनी माळी ,प्रियंका पवार ,आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments