वैष्णवी अनिल सोमवंशी हि सी एम ए या पदवी परीक्षेत उत्तीर्ण! सर्व क्षेत्रातून होत आहे तिचे अभिनंदन!

शिर्डी ( प्रतिनिधी)-शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान मध्ये साईप्रसादालयातील कार्यालयात नोकरीला असणाऱ्या अनिल एकनाथ सोमवंशी यांची कन्या वैष्णवी अनिल सोमवंशी ही सी एम ए या पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 
वैष्णवी अनिल सोमवंशी ही लहानपणापासूनच एक जिद्दी व हुशार विद्यार्थिनी होती. व तिला सी एम ए या विषयांमध्ये मोठी आवड होती. 

त्यामुळे तिने हे क्षेत्र निवडून रात्रंदिवस मोठा अभ्यास करून या सी एम ए पदवी परीक्षेत हे मोठे यश मिळवले आहे. हे यश मिळवल्यानंतर तिची साई संस्थांनने सुद्धा दखल घेत साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वैष्णवीचा संस्थांनच्या शैक्षणिक संकुलात एका कार्यक्रमात शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत तिचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे संस्थांनचे भोसले साहेब, अतुल वाघ साहेब यांनीही वैष्णवीचे अभिनंदन केले आहे. वैष्णवी हिला अनिल एकनाथ सोमवंशी, एकनाथ जनार्दन सोमवंशी, सुनील एकनाथ सोमवंशी, विराट अनिल सोमवंशी, सुचित सुनील सोमवंशी, व कुटुंबातील सर्व सदस्यांचे तसेच शिक्षकांचेही या यशासाठी मोठे सहकार्य मिळाल्याचे वैष्णवी सोमवंशी हिने सांगितले असून प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थ्यानीनी जिद्द, ध्येय ठेवून वेळेवर व शांत चित्ताने अभ्यास केला तर नक्कीच कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते. 

असा इतर विद्यार्थ्यांना तिने संदेशही यावेळी दिला. तर वैष्णवी चे वडील अनिल एकनाथ सोमवंशी यांनी आपल्या मुलीने सी एम ए या परीक्षेत यश मिळवले , तिने मोठ्या मेहनतीने परिश्रमाने हे यश मिळवले असून या यशामुळे आम्हालाही मोठा मनस्वी आनंद झाल्याचे यावेळी सांगितले. या यशाबद्दल वैष्णवीचे सर्व क्षेत्रामधून मोठे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments