गुरु–शिष्य परंपरेत शिष्यालाही मोठे महत्त्व आहे.पण खरे शिष्य आणि खोटे शिष्य यांचा फरक ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक संतांनी याबद्दल स्पष्ट मार्गदर्शनही केले आहे.खरे शिष्य हे गुरुच्या चरणी पूर्ण श्रद्धा, नम्रता आणि आचरण ठेवतात.गुरुच्या वचनावर अढळ श्रद्धा विश्वास असतो. गुरुने सांगितलेला मार्ग निःसंशय पाळतो.अहंकार सोडून विनम्र राहतो. गुरुची सेवा व आत्मसाधना दोन्ही करतो.लाभ, मान-प्रतिष्ठा किंवा लोभ यासाठी गुरूजवळ राहत नाही. स्वार्थरहित भक्ती असते. तो खरा शिष्य असतो.व अशा शिष्याचे गुरुच्या संगतीने जीवन शुद्ध, शांत व संयमी होते. असे श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत राजराजेश्वरी संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.
“गुरु आज्ञा पालन करणारा, तोच खरा शिष्य होय.पण आजच्या आधुनिक युगात
खोटे शिष्यही असतात.ते बाहेरून भक्त दिसतात .पण आतून स्वार्थी असतात.
स्वार्थासाठी जवळ येणे ,धन, मान किंवा प्रसिद्धीसाठी गुरुचा आधार घेतात.
आज्ञा न पाळणे , गुरुचे बोलणे ऐकतात पण आचरणात आणत नाहीत. स्वतःला मोठे समजतात. बाहेर भक्ती दाखवतात पण अंतःकरण शुद्धता नसते.स्वार्थ पूर्ण न झाल्यास गुरुचा अनादर करतात.
संत कबीर म्हणतात,
“गुरु की करनी गुरु जाये, चेला की करनी चेला।”
अर्थात, खरा शिष्य गुरुच्या शिकवणीप्रमाणे जीवन बदलतो.
गुरु हा संत कुळीचा राजा असतो.
जो गुरुच्या वचनाने जीवन बदलतो. तो खरा शिष्य असतो.
जो फक्त नावाने शिष्य आहे. पण आचरणात बदल नाही. तो खोटा शिष्य ठरतो.
मी गुरुच्या ज्ञानानुसार चालतो का? फक्त ऐकतो?
याच प्रश्नात खऱ्या शिष्यत्वाचा मार्ग दडलेला आहे.असे सांगत जे गुरुच्या वचनावर श्रद्धा ठेवतात, गुरुची आज्ञा पाळतात, नम्रतेने साधना करतात आणि स्वतःचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करतात.ते खऱ्या शिष्यांच्या यादीत येतात.व
खोट्या शिष्यांच्या यादीत
जे फक्त नावाने शिष्य असतात, पण गुरुची शिकवण आचरणात आणत नाहीत; ज्यांना साधनेपेक्षा मान-प्रतिष्ठा, स्वार्थ किंवा दिखावा अधिक प्रिय असतो.ते येतात.मी कोणाचे नाव कोणत्या यादीत लिहिले आहे हे सांगण्याची मला गरज नाही.कारण प्रत्येकाने स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहिले तर त्याला सहज कळेल की ,तो कोणत्या यादीत आहे.
म्हणून माझ्या सर्व शिष्यांना एवढीच विनंती आहे की,
स्वतःला विचारा:मी गुरुची आज्ञा पाळतो का?
माझी साधना प्रामाणिक आहे का?माझ्यात नम्रता आणि सेवा वृत्ती आहे का?माझ्या जीवनात गुरुच्या ज्ञानामुळे परिवर्तन झाले आहे का?या प्रश्नांची उत्तरेच ठरवतील की आपण खऱ्या शिष्यांच्या यादीत आहात की खोट्या शिष्यांच्या यादीत.
जो मनापासून आत्मपरीक्षण करतो आणि स्वतःला सुधारतो, तोच खऱ्या अर्थाने गुरुचा शिष्य होण्यास पात्र ठरतो. असे सांगत महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी गुरु -शिष्य या नात्यातील खरा अर्थ व उपदेश करत पुढे म्हटले आहे की, खरे शिष्याची तिसरी यादी
जी ईश्वराच्या करंगळीवर लिहिली जाते. तो शिष्य खऱ्या अर्थाने जो मनापासून साधना करतो, नम्र राहतो आणि गुरुच्या मार्गावर चालतो,
त्याचे नाव शेवटी त्या ईश्वराच्या यादीतच नोंदले जाते. जे नुसते बाहेरून नव्हे तर अंतकरणाने शुद्ध असतात. ज्यांची साधनां स्वार्थी नसते .जे गुरु आणि ईश्वराला पूर्ण समर्पित असतात माणूस कोणाला खरा किंवा खोटा समजेल पण अंतकरणाची खरी परीक्षा फक्त परमेश्वरच घेतो म्हणून प्रत्येकाने स्वतःला विचारावे मी कोणत्या यादीत आहे, पहिल्या दुसऱ्या की तिसऱ्या ईश्वराच्या यादीत आपण आहोत. याचे प्रत्येक शिष्याने आत्मपरीक्षण करावे.व गुरुच्या, ईश्वराच्या शिष्य यादीत आपले नाव यावे तसा प्रयत्न करावा. कारण अशा शिष्यांचे गुरुच्या संगतीने जीवन शुद्ध, शांत व संयमी होते.असे महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.
0 Comments