अटल टिंकरिंग प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभानचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम, आठवीच्या मुलाने बनवले अँड्रॉइड मोबाईल ऍप

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी:-अहिल्यानगर येथील रेणावीकर विद्यालय येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय अटल टिंकरिंग विद्यार्थी व शिक्षक प्रकल्प प्रदर्शनामध्ये टाकळीभान येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी ओम सोमेश्वर आरगडे याचा डिजिटल साक्षरता विभागामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. 

या विद्यार्थ्याने बीएमआय कॅल्क्युलेटर हे अँड्रॉइड मोबाईल एप्लीकेशन तयार केले, जे आपल्याला मोफत आणि इंटरनेटशिवाय आपल्या वजन आणि उंचीच्या प्रमाणानुसार आरोग्याबद्दल अधिक माहिती सांगेल.
 ओम आरगडे यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य श् बापूसाहेब पटारे, स्कुल कमिटी सदस्य मंजाबापू थोरात व राहुल पटारे यांनी अभिनंदन केले आहे .ओम आरगडे याला मुख्याध्यापक शिंदे आर.एम. पर्यवेक्षक जरे एस.एस. अटल टिंकरिंग विभागप्रमुख पवार एस.एस. तसेच श्रीम.पालवे एन.ए., श्रीम.पांढरे डी.ए. आणि सर्व शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन लाभले असून त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे!

Post a Comment

0 Comments