दिलीप शिंदे
सोयगाव दि.०७ - छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बाल सवंगड्यांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रचत, स्वराज्य स्थापनेच्या पवित्र कार्याचा श्री गणेशा करण्यासाठी त्यांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने किल्ले प्रचंडगड हि पहिली मोहीम जिंकून किल्ले . प्रचंडगडाचे नामकरण किल्ले तोरणा असे केले,हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. हि पहिली मोहीम (लढाई) रयतेच्या कल्याणासाठी ऐतिहासिक अशी लढाई (मोहीम) ठरली. या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व ओळखून शिवशंभू संघटनेच्या वतीने दरवर्षी दि. ७ मार्च रोजी "हिंदवी स्वराज्याचे तोरण उस्तव ऐतिहासिक विजय दिवस किल्ले तोरणा येथे साजरा करण्यात येतो.
याच अनुषंगाने ही संस्था राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानित करते. सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( गतीविधी ) पर्यावरनाची दायित्व असलेले डॉ. संतोष पाटील यांना "स्वराज्य प्रेरणा राज्यस्तरीय पर्यावरण रक्षक पुरस्कार - २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले. संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज अनिकेत महाराज मोरे ( देहू )छत्रपती शिवाजी महाराज यांचे नागपूर गादि चे वंशज सचिन भोसले, येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, शेलार मामा यांचे वंशज राहुल शेलार, शिव शंभु संघटनेचे संस्थापक -अध्यक्ष तानाजी पवार,सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख रेश्मा जगताप यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. स्मृती चिन्ह, सन्मान पत्र, मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दुर्मिळ वनस्पती रोपण - जतन, वन्यजीव संवर्धन, हरितवारी, या १५ वर्षां पासुन करत असलेल्या कार्या साठी त्यांना गौरविण्यात आले. त्यांनी हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या देश सेवेस समर्पित केला आहे. यावेळी जॉकिं चौधरी ( पुणे ),बहुली येथील भाऊ साहेब निकोद, भिकन सोन्ने यांची उपस्थिती होती. अंजनाई गोशाळेचे अध्यक्ष संदिप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम दत्तू रोकडे, आरोग्यदूत डिगु वाघ, कृषिभूषण अरुण सोहनी,अनिल लोखंडे,अशोक ढगे, भावडू गाडेकर,शाम पाटील,राहुल सोनवणे,दिलीप सुरडकर,हरीश पाटील,भगवान कोथलकर आदींसह राज्यातील पर्यावरण स्नेही कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments