दिलीप शिंदे
सोयगाव दि.०७--सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात ५४ वर्षाच्या नराधमाने पीडिता एकटी असल्याचे फायदा घेत घरात घुसून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला दि.०७ शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला दि.९ सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
शेख रमजान शेख मोहम्मद(वय ५४) याने ८० वर्षीय वृद्ध महिला घरात एकटी असल्याचे पाहून गुरुवारी रात्री लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला दरम्यान याप्रकरणी शेख रमजान शेख मोहम्मद याला सोयगाव पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती दरम्यान त्यास शनिवारी न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, सादिक तडवी,अजय कोळी,गजानन दांडगे, संजय सिंघम आदी करत आहे.
0 Comments